`ब्लॅक टायगर`पासून सलमान खान दूर!
सलमान खान काय करतो, काय नाही, त्याच्या आवडी-निवडी, आगामी चित्रपट यावर त्याचे फॅन लक्ष ठेवून असतात. भारतीय हेर आणि रॉ गाजवणारे रवींद्र कौशिकच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीबाबत चर्चा सुरू असल्याचे सलमानने करोनाच्या काळात मीडियाला सांगितले होते. त्याचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता करणार होते. आता मात्र त्याला बराच काळ लोटल्यानंतर सलमान या स्पाय मूव्हीबाबत फारसा उत्साही असल्याचे दिसत नाही.
भाईजानचा यातील इंटरेस्ट का कमी झाला याबाबत असे सांगण्यात येते की, सलमान या अगोदरच टायगरच्या मालिकेतील चित्रपटात काम करत आहे. टायगरच्या पहिल्या भागात जे यश मिळाले त्यावरून भविष्यातही टायगरची फ्रॅन्चायजी चांगली धमाका करेल. पुन्हा त्याने हेरगिरीवर आधारित चित्रपट केला तर दोन्ही चित्रपटातील व्यक्तिरेखांची तुलना होईल. यामुळे दुसरी स्पाय मूव्ही करण्यात त्याला इंटरेस्ट नाही. विशेष म्हणजे हेरगिरीत असामान्य कामगिरी करणारे रवींद्र कौशिक यांचे सांकेतिक नाव टायगर असेच होते. त्यामुळे दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये आणखी साम्य आढळेल. याबाबत बरीच चर्चा झाल्यानंतर सलमानने कौशिक यांच्या जीवनावर आधारित ब्लॅक टायगरपासून दूर राहण्याचे ठरवले आहे.
ब्लॅक टायगर या चित्रपटाचे हक्क राजकुमार गुप्ता यांच्याकडे होते. कालांतराने त्यांनी हे हक्क अबाधित ठेवण्याचे प्रयत्न केले नाहीत आणि त्यांनी हक्क गमावले. सध्या हे हक्क अनुराग बसू यांनी मिळवले असून त्यांना ब्लॅक टायगर बनवायचा आहे. त्यांच्याही मनात ती भूमिका सलमानने करावी असे आहे. सलमानची भूमिका पाहता ब्लॅक टायगरची भूमिका कोणाकडे जाईल हे अनिश्चित आहे. कदाचित, एखादा नवा अभिनेता ही भूमिका करेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.