हास्यजत्रे साठी सईची भावूक पोस्ट
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या मराठी सोबत बॉलिवुड मध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत असताना सई ने सोशल मीडिया वर एक खास पोस्ट करून ती " या " गोष्टीला खूप मिस करत असल्याचं सांगतेय. सई कायम चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहे आणि नुकतीच ती तिच्या दोन सुपरहिट चित्रपटाचं यश साजर करताना देखील दिसतेय. " भक्षक " आणि " श्री देवी प्रसन्न " या दोन सुपरहिट चित्रपटा नंतर आता सई नक्की काय करतेय हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सई सध्या एक वेब शो साठी शूट करण्यात व्यस्त असून " महाराष्ट्राची हास्यजत्रा " मधली तिची खास जागा ती मिस करते अस तिने प्रेक्षकांना सांगितलं. आगामी वेब शो साठी शूटिंग करत असल्याने सई हास्यजत्रा मध्ये दिसत नसून तिने या बद्दल भावूक पोस्ट केली आहे.
सई भावूक होऊन म्हणते " वेब शो शूट करतेय म्हणून मी माझा खास शो आणि त्यातली द चेयर मिस करतेय " सईच्या या पोस्ट ने प्रेक्षकांचं लक्ष वेधून तर घेतलं आहे पण सईच्या नव्या प्रोजेक्ट साठी प्रेक्षक उत्सुक आहेत हे देखील कळतंय.
बॉलिवुड मध्ये सईच्या अभिनयाचा दबदबा कायम असताना आता सई आता मराठी की हिंदी वेब शो करतेय ? हे अजून स्पष्ट होणं बाकी आहे. लवकरच सई या बद्दल तिच्या प्रेक्षकांना सांगेल यात शंका नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.