रणबीर पुन्हा रोमँटिक भूमिकेत!

चॉकलेट हिरो म्हणून एव्हरग्रीन देवआनंद याने प्रदीर्घ काळ बॉलिवूडवर राज्य केले. त्यानंतर चॉकलेट बॉय अशी प्रतिमा लाभलेला अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. त्याच्या प्रतिमेला साजेशा अशा भूमिकेत रणबीर फॅनच्या भेटीला येत आहे. ८ मार्चला त्याचा तू झूठी, मै मक्कार हा चित्रपट भेटीला येत असून त्यात श्रद्धा कपूर त्याच्या समवेत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 18 Feb 2023
  • 03:38 pm
PuneMirror

रणबीर पुन्हा रोमँटिक भूमिकेत!

श्रद्धाबरोबरचा तू झुठी, मै मक्कार, लवकरच पडद्यावर

चॉकलेट हिरो म्हणून एव्हरग्रीन देवआनंद याने प्रदीर्घ काळ बॉलिवूडवर राज्य केले. त्यानंतर चॉकलेट बॉय अशी प्रतिमा लाभलेला अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. त्याच्या प्रतिमेला साजेशा अशा भूमिकेत रणबीर फॅनच्या भेटीला येत आहे. ८ मार्चला त्याचा तू झूठी, मै मक्कार हा चित्रपट भेटीला येत असून त्यात श्रद्धा कपूर त्याच्या समवेत आहे. 

रणबीर आणि श्रद्धा यांचा हा पहिला चित्रपट आहे. यामुळे त्यांची केमेस्ट्री चित्रपटात कशी असेल याविषयी कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटात बऱ्याच काळानंतर रणबीर रोमँटिक भूमिका साकारत असल्याचे पाहावयास मिळणार आहे. श्रद्धाही बऱ्याच काळानंतर या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लव्ह रंजनने केले आहे. याशिवाय रणबीरचा ॲनिमल हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये रश्मिका मंदाना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आणि शक्ती कपूर यांच्या भूमिका आहेत.

चॉकलेट बॉय रणबीर कपूरने हल्लीच आलिया भट्ट बरोबर दोनाचे चार हात केले आहेत. असे असले तरी चॉकलेट बॉय रणबीरबाबतचे तरुणींमधील आकर्षण किंचितही कमी झाले नाही. बडबड्या म्हणून प्रसिद्ध असलेला रणबीर सेटवर हसत-खेळत, मस्ती करत, सह अभिनेत्यांची खिल्ली उडवत काम करत असतो. त्याच्या अस्तित्वाने सेट कसा उत्साहाने भरभरून वाहात असतो. रॉकस्टारमध्ये रणबीरबरोबर काम करणाऱ्या पियूष मिश्राच्या मतानुसार त्याच्याबरोबर गप्पा मारायला 

सगळ्यांना आवडते. उमद्या व्यक्तिमत्त्वाचा रणबीर आपल्या मजेशीर आणि खेळकर गप्पांमुळे इतरांचा मूड अगदी बदलून टाकतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story