नवाजुद्दीन सिद्दीकीने दिली कबुली; म्हणाला, साऊथचे चित्रपट पैशांसाठीच करतो!

‘‘मला पैशाची पर्वा नाही. पण मी दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात काम करतो कारण तिथे त्याला चांगला पैसा मिळतो. साऊथ चित्रपटांत मला मिळालेल्या अनेक भूमिका चांगल्या नव्हत्या.  तरी पैशांमुळे मी त्या केल्या,’’ असेही नवाजने मान्य केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 20 Jul 2024
  • 05:06 pm
South Film Industry, Nawazuddin Siddiqui

संग्रहित छायाचित्र

चतुरस्र अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपण पैशासाठी साऊथमधील चित्रपट करीत असल्याचे कबूल केले आहे.

‘‘मला पैशाची पर्वा नाही. पण मी दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात काम करतो कारण तिथे त्याला चांगला पैसा मिळतो. साऊथ चित्रपटांत मला मिळालेल्या अनेक भूमिका चांगल्या नव्हत्या.  तरी पैशांमुळे मी त्या केल्या,’’ असेही नवाजने मान्य केले.

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला, ‘‘मी जेव्हा 'रमन राघव'सारख्या चित्रपटात काम करतो, तेव्हा माझ्या भावना, विचार, आत्म्यावर माझा ताबा असतो, पण जेव्हा मी साऊथचे चित्रपट करतो तेव्हा त्यातील पात्रांबद्दल मला खात्री नसते. पण मला चांगले पैसे मिळाले हे मी मान्य करतो. मलाही अपराधी वाटतं. मला वाटते की मला इतके पैसे मिळाले आहेत, पण कधी कधी मी काय करतोय ते मला समजत नाही.’’

नवाज पुढे म्हणाला की, साऊथच्या काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर आपणच आपल्याला फसवल्याचे मला जाणवते. प्रेक्षकांना कदाचित समजणार नाही, पण मला माहित आहे. हे एखाद्या जाहिरातीसारखे आहे. मला त्या उत्पादनाबद्दल कोणतीही भावना नाही, मला फक्त त्यातून मिळणाऱ्या पैशाची काळजी आहे.

१९ मे १९७४ रोजी उत्तर प्रदेशातील बुढाना शहरात जन्मलेला नवाजुद्दीन जवळपास १५ वर्षांच्या संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडू शकला. एकेकाळी चौकीदार असलेला नवाज आजही वेळ काढून आपल्या गावी जातो आणि शेतीही करतो. ‘‘तो पैशासाठी चित्रपटात आला नाही.  बुढाणा येथे साखर कारखाना आहे. मी तिथे काम करत राहिलो असतो तर मला इतके पैसे मिळू शकले नसते,’’ असे नवाज म्हणाला.

नवाजने १९९९ मध्ये आलेल्या 'सरफरोश' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. त्यात त्याची छोटीशी भूमिका असली तरी २०१२ पर्यंत नवाजने अनेक छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले, पण त्याला विशेष ओळख मिळाली नाही. त्यानंतर अनुराग कश्यपने त्याला 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये फैजलच्या भूमिकेत आणले आणि फैजलच्या भूमिकेने तो घराघरात लोकप्रिय झाला.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest