नर्गिस फाखरी लवकरच अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्या समवेत शिवशास्त्री बोलबोआ या चित्रपटातून फॅनच्या भेटीला येत आहे.
नर्गिस
नर्गिस फाखरी लवकरच अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्या समवेत शिवशास्त्री बोलबोआ या चित्रपटातून फॅनच्या भेटीला येत आहे. नर्गिसचे या चित्रपटातून पुनरागमन होत आहे. या चित्रपटाच्या कथेमुळे आपण खूप प्रभावित झाल्याचे सांगून ती एका मुलाखतीत म्हणते की, चित्रपटाची पटकथा वाचली तेव्हा त्यातील वेगळेपण मला आढळून आले. ही कथा खरं तर पुन्हा पुन्हा सांगण्याची इच्छा होईल इतकी प्रभावी आहे. कुठे तरी असे वाटते की ही कथा आपल्या घरातील, मित्रांची, शेजाऱ्यांची आहे. चित्रपटात मी करत असलेली भूमिका अर्धी भारतीय आणि अर्धी अमेरिकन आहे. त्यातील व्यक्तिरेखेचे नाव सिया असे असून ती खोडकर, कायम आनंदी राहणारी आहे. माझ्या बरोबर नायकाच्या भूमिकेत शारीब हाशमी असून त्याची आणि माझी व्यक्तिरेखा परस्परविरोधी आहे. तसेच दक्षिणेचा यशोदा हा चित्रपट मी अलीकडेच पाहिला. त्याचा रिमेक जर झाला तर त्यातील समांथाने केलेली भूमिका करायला मला नक्की आवडेल. वास्तववादी असलेला यशोदा चित्रपट बघून असे वाटते की वेगळ्या पण सत्य घटना आपण चित्रपटांच्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.
आपल्याला भयपट अधिक आवडतात असे सांगून ती म्हणते की, आपणाला ओटीटीवर काम करायला अधिक आवडेल. मात्र, भारतात भयपटांना फार स्थान नसल्याचे दिसते. मात्र, भविष्यात अशा चित्रपटाचा हिस्सा बनायला आवडेल. अभिनय क्षेत्र असे आहे की जेथे तुम्ही वेगवेगळ्या शेडच्या भूमिका करू शकता. ॲक्शन चित्रपटही मला करायला आवडतात. खरं तर मला हेल्थ आणि फिटनेसमध्ये खूप इंटरेस्ट आहे. कधी कधी असं वाटते की पुन्हा शाळेत जावे आणि चांगले मार्क मिळवून डॉक्टर व्हावे. डॉक्टर होणे माझे स्वप्न होते. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी हेल्थबाबतच्या बातम्या आवडीने वाचत असते. अनेकजण माझी डॉक्टर होण्याची इच्छा ऐकून खूप हसतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.