मृण्मयीच्या अभिनयावर शिक्कामोर्तब
सोशल मीडियावर मृणमयी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते निरनिराळे फोटो व व्हीडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान मृण्मयीची नवी पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
५७वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक कलाकारांना निरनिराळ्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मृण्मयी देशापांडेच्या ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटाला कै.स्मिता पाटील पुरस्कार’ मिळाला. या पुरस्कारानिमित्त मृण्मयीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मृण्मयीने आपल्या इन्स्टाग्रामवर पुरस्काराचे स्मृतीचिन्हाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले. “काल आमच्या ‘miss you mister’ या फिल्मसाठी महाराष्ट्र शासनाचा
‘कै.स्मिता पाटील पुरस्कार’ मिळाला. अजूनही ही फिल्म कुठे बघता येईल असे मेसेज सतत येतात. मृण्मयीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.मृण्यमयी देशपांडे सध्या तिच्या नवरा स्वप्नील रावबरोबर केरळ ट्रीपवर आहे. अभिनेत्रीने या ट्रीपदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मृण्मयी व स्वप्नील सध्या केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरीजमधून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. सुभेदार चित्रपटात मृण्मयीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर मृणमयी ‘मुंबई डायरीज’ वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात झळकली होती. २६/११ च्या हल्ल्याच्या दिवशी डॉक्टर कोणत्या परिस्थितीत होते याचे उत्कृष्ट रित्या वर्णन दिग्दर्शक निखिल आडवाणीने या सीरिजमध्ये केले आहे. या सीरिजमध्ये मृण्मयी देशपांडेबरोबर मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, श्रेया धन्वंतरी, सत्याजीत दुबे आणि नताशा भारद्वाज प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.