चाहत्यांमुळे मनीषाचा प्रवास शक्य!
त्यानंतर तिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सोशल मीडियावर एक दिवस अगोदरच मनीषाचं नाव विजयी म्हणून समोर आले होते.
टीव्ही मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सुरू असणाऱ्या रियॅलिटी शोमध्ये 'झलक दिखला जा'चे नाव घेता येईल. या रियॅलिटी शो चा अकरावा सीझन पार पडला असून त्यातील सहभागी स्पर्धकांविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. अशातच मनीषा राणीने विजेतेपद मिळवल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आले आहे.
सोशल मीडियावर मनीषाच्या नावाची चर्चा आहे. ती विजयी होताच तिच्यावर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सगळ्यात मनीषाची प्रतिक्रिया देखील चर्चेत आली आहे. ती नेमकी काय म्हणाली हेही आपण जाणून घेऊयात.
मनीषाला झलक दिखला जा चे विजेतेपद मिळवल्यानंतर तिला ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. त्यानंतर तिनं इंस्टावरूरुन चाहत्यांचे आभार मानले आहेत. मी माझ्या सर्व चाहत्यांचे खूप आभार मानते. त्यांच्या मुळेच हा प्रवास शक्य झाला. त्यांनी केलेल्या सहकार्याविषयी मी त्यांची आभारी आहे.
शेवटी ती म्हणते की, मी आता जे काही पाहते आहे ते सगळे खरे आहे यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्यासाठी एक ते दीड लाख व्होटिंग एका दिवसांत आली. मला एवढे प्रेम मिळाले हेच माझ्यासाठी खूप आहे. लोकांनी मला जे खूप सहकार्य केले त्यासाठी त्यांना धन्यवाद, अशा शब्दांत मनीषा राणीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.