जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल, जाणून घ्या काय झालंय?

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला फूड पॉयजनिंग झाल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे वडील बोनी कपूर यांनी याला दुजोरा दिला आहे. बोनी कपूर यांनी सांगितले की, ‘‘जान्हवीची प्रकृती आता चांगली आहे आणि ती एक-दोन दिवसांत बरी होईल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 20 Jul 2024
  • 05:14 pm
Janhvi Kapoor, Bollywood

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला फूड पॉयजनिंग झाल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे वडील बोनी कपूर यांनी याला दुजोरा दिला आहे.
बोनी कपूर यांनी सांगितले की, ‘‘जान्हवीची प्रकृती आता चांगली आहे आणि ती एक-दोन दिवसांत बरी होईल. त्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.’’ गेल्या काही दिवसांपासून जान्हवीची तब्येत ठीक नव्हती, त्यानंतर तिला गुरुवारी रुग्णालयात दाखल करावे लागले.

गेले काही आठवडे जान्हवी खूपच व्यस्त होती. मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमांना तिने हजेरी लावली. जान्हवीचा आगामी चित्रपट ‘उलझ’ हा आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जान्हवी एका आयएफएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशू सारिया या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जंगली पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

जान्हवीशिवाय गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यूदेखील या चित्रपटात दिसणार आहेत. 'उलझ'ची कथा आयएफएस अधिकारी सुहाना भाटियाच्या आयुष्याभोवती फिरते. पण, तिच्या कारकिर्दीच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर, सुहाना (जान्हवी) एका षड्यंत्राची बळी ठरते आणि तिच्या जीवाला धोका निर्माण होतो. नंतर पुढे काय होते, हे माहित करून घेण्यासाठी तुम्ही चित्रपट बघायला हवा.  'उलझ' व्यतिरिक्त, जान्हवीकडे आणखी दोन चित्रपट आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest