संग्रहित छायाचित्र
पाकिस्तानी टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक ही सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. याला कारणही तसेच आहे. मिनाहिलचा एक 'नको तो व्हिडिओ' इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मिनाहिल मलिकला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार मिनाहिल ही पाकिस्तानमधील कराची येथे राहणारी आहे. टिकटॉकवर तिचा खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे. आपल्या टिकटॉक व्हिडिओसाठी पाकिस्तानमध्ये ती खूप फेमस आहे.
सोशल मिडियावर मिनाहिल हिचा एक 'एमएमएस' व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मिनाहिल एका तरुणासोबत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघांचे प्रायव्हेट क्षण दिसत आहेत. मिनाहिलच्या व्हायरल व्हिडिओची माहिती समोर येताच हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. दरम्यान, मिनाहिलने आता या व्हिडिओवर खुलासा केला आहे. तिने या या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे. मिनाहिलच्या व्हायरल व्हिडिओमुळे तिचे कुटुंबीय देखील काळजीत आहे.
या व्हायरल व्हीडिओबाबत मिनाहिलने मौन सोडले आहे. ती म्हणाली, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक आहे. या व्हिडिओबाबत मी पोलिसांत तक्रार केली आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला लवकरच अटक केली जाईल. घरात आई-बहीण नसलेली आणि महिलांबद्दल आदर नसलेली व्यक्तिच असे कृत्य करू शकते. असे म्हणत तीने चाहत्यांकडून मदतीची विनंती केली आहे. तसेच तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत असे काही घडले तर त्याचा तत्काळ रिपोर्ट करावा असे देखील मिनाहिल म्हणाली.