File Photo
मागील काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या बातम्यांवर अभिषेक बच्चन याने प्रतिक्रिया देखील दिली होती. अभिषेक म्हणाला होता की, मी घटस्फोट घेणार आहे हे मला कळवल्याबद्दल धन्यवाद. आता मी लग्न केव्हा करणार हे पण मला सांगावे.
अभिषेक आणि अभिनेत्री निम्रत कौर यांच्या अफेअरच्या अफवा मागील काही दिवसांपासून पसरत आहेत. दोघांनीही 'दसवी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र या दोघांनीही त्यांच्या अफेअरच्या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची देखील चर्चा सोशल मीडियावर नेहमीच सुरू असते.
एक विशेष गोष्ट म्हणजे इन्स्टाग्रामवर १४ मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स असणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय ही केवळ एकाच व्यक्तीला फॉलो करते. ती व्यक्ती म्हणजे तिचा नवरा अभिषेक बच्चन होय. तसेच इन्स्टाग्रामवर तिचे युजरनेम देखील ऐश्वर्या राय-बच्चन असेच आहे. त्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे त्या दोघांनाच ठाऊक. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न २००७ साली झाले होते. त्या दोघांना आराध्या नावाची मुलगी आहे.
जुलै महिन्यात अभिषेक बच्चन हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला त्याच्या कुटुंबासह उपस्थित राहिला होता. संपूर्ण बच्चन कुटुंब रेड कार्पेटवर होतं. मात्र त्यावेळी ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या ह्या दोघी बच्चन कुटुंबीयांसोबत नव्हते. अभिषेक आल्यानंतर काही वेळाने ऐश्वर्या राय आपल्या मुली सोबत रेड कार्पेटवर येताना दिसली. ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन कुटुंबासोबत न येता वेगळे आल्याने अभिषेक आणि तिच्यामध्ये काहीतरी खटकले असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर ते दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.