File Photo
सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडिस यांची लव्ह स्टोरी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सुकेश हा जॅकलीनबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यात कधीही नाही. तो तुरुंगातून तिला नेहमी पत्र पाठवत असतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुकेशने असेच एक पत्र जॅकलीनला पाठवले आहे. त्यात तो अत्यंत व्याकुळ झाल्याचे दिसत आहे. एव्हढेच नाही तर त्याने त्यांच्या प्रेमकथेची तुलना थेट रामायणाशी केली आहे. तुरुंगातून लवकरच तो जॅकलीन भेटायला जाणार असल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे.
सुकेश चंद्रशेखर यानं जॅकलीन फर्नांडिसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बेबी, आपल्या प्रेमाची कहाणी रामायणापेक्षा कमी नाही. कारण जसे प्रभू राम त्यांच्या सीतेसोबत वनवासातून परतले होते. तसेच मी पण या छोट्या वनवासातून परत येत आहे. माझ्या जॅकलिनसाठी. जेणे करून मी तिला पुन्हा जिंकेन. हे करण्यापासून मला कोणताही रावण अडवू शकत नाही. प्रभू रामाचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. आता आपली वेळ आली आहे, बेबी.
सुकेशने पुढे लिहिले की, आता माझी घरी परतण्याची वेळ जवळ आली आहे. आता मला तुझ्यासोबत असण्याला आणि पुढील वर्षी दिवाळी एकत्र साजरी करण्याला कोणीही अडवू शकणार नाही. इथे या लंकेत तुझ्याशिवाय ही माझी शेवटची दिवाळी असेल. सुकेशने जॅकलिनप्रती आपलं प्रेम व्यक्त करताना म्हटले आहे की, जगाला वाटेल मी वेडा आहे. पण आपल्या नात्यातली खोली त्यांना कळूच शकणार नाही.
सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसच्या नवीन गाणे ‘स्टॉर्मरायडर’चं कौतुक केले होते. तसेच यूट्यूबवर तिच्या गाण्याला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांना तो तो २५ महिंद्रा थार रॉक्स कार्स आणि २०० आयफोन १६ प्रो भेट देणार असल्याचे त्याने यापूर्वी जाहीर केले होते.