अर्जुन कपूर म्हणाला, 'आता मी सिंगल आहे... रिलॅक्स'! मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलीवूडमधील नेहमीच चर्चेत राहणार कपल आहे. मात्र गेल्या काही काळापासून अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपची चर्चा सुरू आहे. ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या चर्चा मागील काही काळापासून सुरू आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Tue, 29 Oct 2024
  • 02:58 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलीवूडमधील नेहमीच चर्चेत राहणार कपल आहे. मात्र गेल्या काही काळापासून अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपची चर्चा सुरू आहे. ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या चर्चा मागील काही काळापासून  सुरू आहेत. त्यातच त्यांच्या ब्रेकअपची चर्चा अजूनच भडकवणारा एक किस्सा मुंबईमधील दादर येथे घडला. एका कार्यक्रमात अर्जुन कपूरने केलेले 'मी सिंगल आहे' असे वक्तव्य केल्याने चर्चांना अजूनच उधाण आले आहे. 

अर्जुन कपूर त्याच्या आगामी चित्रपट 'सिंघम अगेन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'सिंघम अगेन'च्या संपूर्ण टीमसोबत तो चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच दिवाळीच्या निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम दादरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सेलिब्रेशनसाठी पोहोचली होती. यादरम्यान अर्जुन कपूरने चाहत्यांची संवाद साधला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अर्जुन कपूर ने काळ्या रंगाचा प्रिंटेड शर्ट घातला आहे. अर्जुन कपूर बोलत असताना  सोबतच अजय देवगन, टायगर श्रॉफ, दिग्दर्शक रोहित शेट्टी हे सगळेजण उपस्थित होते. 

अर्जुन कपूर बोलत असताना  मागून आवाज आला. मलायका कशी आहे? यावर अर्जुन म्हणाला,  "मी सिंगल आहे, रिलॅक्स. आयोजकांनी आताच मला टॉल आणि हँडसम म्हटले. ते माझ्या लग्नाची बोलणी करायला जात असल्याचे वाटत आहे".  अर्जुन कपूर हे सगळं मस्करीत म्हणत होता की खरोखरच त्याचे मलायकासोबत ब्रेकअप झाले आहे याबाबत अजूनच संभ्रम वाढला आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. 

'सिंघम अगेन' बद्दल पुढे बोलताना अर्जुन म्हणाला, आम्ही खूप प्रेमाने हा चित्रपट बनवला आहे. मला आशा आहे तुम्ही आमच्यासोबत दिवाळी साजरी कराल. आमचा हा चित्रपट बघाल. तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. मराठीत बोलण्याचा विचार करून आलो होतो. पण आता बोलता येत नाहीये. पुढच्या वेळी नक्की मराठीत बोलेन. तोपर्यंत जय महाराष्ट्र. 

२०१६ पासून मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशिप मध्ये असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या रिलेशनशिप बद्दल उघडपणे सांगितले होते. गेल्या महिन्यात जेव्हा मलायकाच्या कुटुंबावर मोठा कठीण प्रसंग ओढवला त्यावेळी अर्जुन तिच्यासोबत दिसला.  मात्र मागील काही काळापासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाही तितक्याच गाजत आहेत. त्यातच अर्जुन कपूरचा मी सिंगल आहे असे म्हटल्याचा व्हिडिओ समोर आल्याने  चर्चांना अजूनच उधाण आले आहे. 

'सिंघम अगेन' हा रोहित शेट्टी यांचा सिनेमा १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात येणार आहे. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटात सलमान खान, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, करीना कपूर, अर्जुन कपूर हे कलाकार दिसणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story