पहिल्याच भेटीत भांडण!

शाहरुख खान आणि काजोल ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम ऑनस्क्रीन जोडींपैकी एक आहे. दोघांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ११९३ पासून ते २०१५ पर्यंत दोघांनी एकत्र काम केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Wed, 30 Oct 2024
  • 07:05 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

शाहरुख खान आणि काजोल ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम ऑनस्क्रीन जोडींपैकी एक आहे. दोघांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ११९३ पासून ते २०१५ पर्यंत दोघांनी एकत्र काम केले आहे. इतक्या वर्षांची मैत्री असणाऱ्या  या दोघांची पहिली भेट मात्र एका वादाने झाली होती. शाहरुख खान आणि काजोल पहिल्यांदा १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बाजीगर चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. शाहरुख खानला काजोलचा बडबडा स्वभाव पसंत पडला नव्हता. तर काजोलला शाहरुख अतिशय त्रासदायक वाटला होता.

एका न्यूज चॅनेलशी बोलताना काजोल आणि शाहरुख यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला. शाहरुखने सांगितले की नवीन वर्षाच्या एका पार्टीनंतर त्या दोघांची भेट झाली. कारण १ जानेवारीला  त्यांच्या 'बाजीगर' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. शाहरुख पार्टीनंतर लगेचच शूटिंगसाठी पोहोचला होता. पार्टीमुळे सगळे लोक थकलेले आणि अस्वस्थ होते. त्यात कॅमेरामनकडे परवाना नसल्यामुळे त्याला अटक झाली होती. त्यात काजोल सेटवर खूपच जोरात ओरडत होती.  शाहरुखने सांगितले की काजोल खूप लाऊड होती. त्याबाबत त्याने अनेकदा तक्रार देखील केली होती. इतकेच नाही तर शाहरुखने काजोलची तुलना मोराशी केली होती. त्यावेळी शाहरुख त्याच्या मेकअप आर्टिस्टला म्हणाला होता की ही कोणत्या प्रकारची अभिनेत्री आहे. ती काही काळ गप्प का राहू शकत नाही?

शाहरुखच्या काजोलबद्दल तक्रारी होत्या. तशाच काही तक्रारी काजोलच्या देखील होत्या. काजोलने सांगितले, जेव्हा पहिल्यांदा ती शाहरुखला भेटली तेव्हा तिला अजिबात आनंद झाला नव्हता. शाहरुख तिला विशेष आवडला नव्हता. तिला तो खूपच खडूस वाटला.

शाहरुख आणि काजोल या जोडीचा बाजीगर हा पहिला सिनेमा होता. त्यानंतर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, करण अर्जुन, कुछ कुछ होता है, माय नेम इज खान, दिलवाले असे हिट सिनेमे या जोडीच्या नावावर आहेत. 

Share this story