संग्रहित छायाचित्र
विद्या बालन आपल्या आगामी चित्रपट ‘भूल भुलैया ३’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एका मुलाखतीत, तिने आपल्या करिअरच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये तिच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रींना संधी दिली गेली. तिला एका तमिळ चित्रपटातून दोन दिवसांतच बदलण्यात आले. निर्मात्याने तिचा अभिनय आणि नृत्याबद्दल अपमानास्पद टिप्पण्या देखील केल्या होत्या.
विद्या बालनने आपल्या करिअरच्या सुरुवातीला ‘परिणीता’, ‘भूल भुलैय्या’ हे चित्रपट केले. या चित्रपटांमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. तीने तिच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’बद्दल आणि त्याच्या सिक्वेलबद्दल मत व्यक्त केले.
विद्या बालनने सांगितलं की, ‘द डर्टी पिक्चर’साठीची ऑफर दिग्दर्शक मिलन लुथरिया घेऊन आला तेव्हा तिने हा चित्रपट तत्काळ स्वीकारला. तिच्या आजूबाजूच्या काही लोकांनी तिला विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला. पण तिने ठामपणे या भूमिकेला होकार दिला. मला अभिनयाची प्रचंड भूक आहे. या चित्रपटासाठी माझ्या विचार करण्यात आला हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते हा चित्रपट माझ्या करिअरमधील सर्वोत्तम ठरला असे विद्याने म्हटले.
विद्याने पुढे म्हणाली की, काही लोकांनी तिच्या इमेजबद्दल विचार करूनच भूमिका निवडण्याचा सल्ला दिला. परंतु तिने त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला विविध भूमिकांमध्ये आजमावण्याचा निर्णय घेतला. विद्याला ‘डर्टी पिक्चर’मधील रेश्मा ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि तिने ती आनंदाने स्वीकारली.
मुलाखतीत तिला विचारण्यात आले की ‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलमध्ये तिला पुन्हा काम करायला आवडेल का? त्यावर नक्कीच आवडेल. अशी भूमिका करून खूप काळ झाला आहे. पुन्हा एकदा अशी भूमिका करण्याचा अनुभव मिळाला तर त्याचा आनंदच होईल असे उतर विद्याने दिले.
‘द डर्टी पिक्चर’ हा २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विद्या बालन, तुषार कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित आहे.