अनन्या पांडेचे 'स्पेशल २६'

अभिनेत्री अनन्या पांडेने ३० ऑक्टोबरला आपला २६वा वाढदिवस साजरा केला. २०१९ मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंड ऑफ द इयर २' या चित्रपटातून तीने सिनेक्षेत्रातील आपल्या करियरची सुरुवात केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 31 Oct 2024
  • 07:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री अनन्या पांडेने ३० ऑक्टोबरला आपला २६वा वाढदिवस साजरा केला. २०१९ मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंड ऑफ द इयर २' या चित्रपटातून तीने सिनेक्षेत्रातील आपल्या करियरची सुरुवात केली. अभिनेता टायगर श्रॉफ सोबत तीने या चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. गेल्या पाच वर्षांत तीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  ‘लायगर’, ‘पति पत्नी और वो’ आणि ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटांत तीने भूमिका साकारल्या आहेत.  सोशल मीडियावर देखील अनन्या कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तीने नवीन घर विकत घेतलं होतं. अतिशय कमी वयात तीने आपलं स्वत:च हक्काचं घर घेतलं होतं. अनन्याकडे आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू 7 सिरिज, रेंज रोव्हर स्पोर्ट, मर्सिडीज बेंज ई क्लास, स्कोडा कोडियाक, हुंडाई सांता फे या गाड्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अनन्या ही ७४ कोटी रुपयांची मालकीण आहे. चित्रपटांशिवाय अनन्या  जाहिराती आणि फॅशन शोजमधूनही ती चांगले पैसे कमावते.

अनन्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास  तीने अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींना डेट केलं आहे. तिच्या बॉयफ्रेंडच्या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते ईशान खट्टर याचं.  ईशान आणि अनन्या यांनी ‘खाली पीली’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर  केली होती. इतर वेळी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर अनन्या हिच्या नावाची चर्चा अभिनेता विजय देवककोंडा याच्यासोबत सुरु होती. दोघांनी ‘लायगर’ सिनेमात एकत्र काम केलं. मात्र दोघांनी कधीच नात्यावर अधिकृत घोषणा केली नाही.  अनन्या आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली होती. दोघे परदेशात फिरायला गेले होते. त्यांचे फोटो सोशल मोडियावर तुफान व्हायरल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story