संग्रहित छायाचित्र
रवीना टंडन (Raveena Tandon) ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. 'मोहरा' हा तिचा हिट चित्रपट होता, तथापि तिने चित्रपट साइन केला तेव्हा ती इतकी मोठी स्टार नव्हती. तसेच, ती 'मोहरा' चित्रपटासाठीही पहिली पसंतीही नव्हती. तिच्या आधी अनेक बड्या अभिनेत्रींनी हा चित्रपट नाकारला होता. चित्रपटाचे सह-पटकथा लेखक शब्बीर बॉक्सवाला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मोहरा चित्रपटाचे पहिले शूटिंग दिव्या भारतीसोबत करण्यात आले होते. निर्मात्यांनी काही दिवस शूटिंग केले, पण नंतर तिचे निधन झाले ज्यामुळे रिकास्टिंग करावे लागले. शब्बीर म्हणाले की, श्रीदेवी त्या काळातील मोठी स्टार होती. जेव्हा तिला चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला तेव्हा तिने नकार दिला, कारण चित्रपटाचा मुख्य नायक अक्षय कुमार त्यावेळी इतका मोठा स्टार नव्हता, तिच्या नकारानंतर शब्बीरने ऐश्वर्या रायचे नाव दिग्दर्शक राजीव राय यांना सुचवले.
खरे तर मी ऐश्वर्याचे काही फोटो पाहिले होते आणि मला ते खूप आवडले. राजीवने मला ऐश्वर्याला फोन करायला सांगितले. जेव्हा मी ऐश्वर्याशी बोललो तेव्हा तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला कारण ती मिस वर्ल्डच्या तयारीत व्यग्र होती. जेव्हा कोणतीही अभिनेत्री सहमत नव्हती, तेव्हा निर्मात्यांनी शेवटी रवीना टंडनला भूमिका ऑफर केली. सुरुवातीला तीदेखील यासाठी तयार नव्हती कारण तिला 'टिप टिप बरसा पानी' चित्रपटातील एका गाण्यात अक्षय कुमारला किस करताना समस्या होती. रवीनाला चित्रपट करायचे होते पण तिचे वडील काय विचार करतील याची तिला भीती वाटत होती. जेव्हा तिने हे राजीवला सांगितले तेव्हा त्याने गमतीने रवीनाला सांगितले की, हा चित्रपट तुझ्या वडिलांना दाखवू नकोस. 'मोहरा' हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट १ जुलै १९९४ रोजी प्रदर्शित झाला होता. तो ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यानंतर अक्षय कुमार मोठा स्टार झाला. 'तू चीज बडी है मस्त मस्त' आणि 'टिप टिप बरसा पानी' या चित्रपटातील गाणी खूप गाजली.