'रामायण' चित्रपटाची अधिकृत घोषणा

बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. २०२६ आणि २०२७ च्या दिवाळीत दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते नमिल मल्होत्रा यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर समाजमाध्यमांवर शेअर केले आहे.

File Photo

बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. २०२६ आणि २०२७ च्या दिवाळीत दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते नमिल मल्होत्रा यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर समाजमाध्यमांवर शेअर केले आहे.

रामायण या चित्रपटात रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम तर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी देवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर केजीएफ स्टार यश हा रावणाच्या भूमिकेत असणार आहे.

 चित्रपटाचे निर्माते नमिल मल्होत्रा ६ नोव्हेंबरला चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मिडियावर शेअर करून लिहिले आहे की, दशकभरापासून रामायण मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा माझ्या प्रयत्न आहे. गेली पाच हजार वर्षे रामायण महाकाव्याने करोडो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. आज हा प्रवास सुंदरपणे आकार घेताना दिसत आहे. आपला इतिहास, आपले सत्य, संस्कृती, आपले रामायण प्रामाणिकपणे, पवित्र पद्धतीने सादर करण्यासाठी आमची टीम लागली आहे. आपले महान महाकाव्य आणि आदराने जीवन जगणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्यासोबत या.  

दरम्यान, रामायण हा चित्रपट ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात येणार आहे. मधु मंटेना, अल्लू अरविंद आणि नमित मल्होत्रा हे संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तसेच हान्स झिमर आणि ए. आर. रहमान यांसारखे ऑस्कर विजेते संगीतकार या चित्रपटाचे संगीत देणार आहेत. हिंदी सोबतच तमिळ, तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story