File Photo
मराठी चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभनेत्री प्रिया बापट हिने नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने चाहत्यांच्या तसेच मुलांच्या बाबतीत प्रश्न विचारणाऱ्यांना तसेच सल्ले देणाऱ्या लोकांना उत्तर दिलं आहे.
प्रिया बापटने नुकतीच अमुक तमुक या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना ती म्हणाली, लग्नाला इतकी वर्षे झाली आता तरी मुलांचं मनावर घ्या असे सल्ले लोक डेत असतात. चाहते यावरून अनेकदा प्रश्न देखील विचारतात.
एकदा एका नाटकाच्या प्रयोगानंतर एका महिलेने थांबून आता गुड न्यूज केव्हा देणार असा प्रश्न केला होता. त्यावेळी विषयात टाळण्याचा प्रयत्न केला मात्र ती महिला ऐकेनाशी झाल्यावर शेवटी तिचा अपमान करण्याशिवाय पर्याय नव्हता, माझी आई मला असे प्रश्न विचारत नसल्याचं प्रियाने यावेळी त्या महिलेला सांगितलं.
प्रिया पुढे म्हणाली , माझ्या आणि उमेशच्या लग्नाला १३ वर्षे झाली. मला मूल नाही. पण तो निर्णय माझा आहे. उद्या ४२ व्या वर्षी मला वाटलं की मूल जन्माला घालायचं तर मी घालेन. त्यासाठी अनेक मार्ग आहेत. तसेच तेव्हाही नाही वाटलं तर नाही घालणार. परंतु असे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक जोडप्याने मूल जन्माला घातलंच पाहिजे असा काही नियम नाहीये. प्रत्येक जोडप्याची अपेक्षा ही मुलं होवू देणंच ही नाहीये.
प्रिया म्हणाली, पूर्वी मला असल्या प्रश्नांचा राग यायचा. मात्र आता मला समज आली आहे. लोक आम्हाला आदर्श मानतात. आमच्यावर प्रेम करतात. आम्हाला आपलं मानतात. म्हणून ते असले प्रश्न करतात. पण मुलं जन्माला घालायचे की नाही हा सर्वस्वी माझा आणि उमेशचा प्रश्न आहे.