संग्रहित छायाचित्र
अलीकडेच 'भूल भुलैया ३' मध्ये झळकलेली अभिनेत्री विद्या बालनने एके काळी 'ज्युनियर माधुरी दीक्षित' बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. एका जुन्या मुलाखतीत विद्या बालनने सांगितले होते की, 'तेजाब'मध्ये माधुरीच्या भूमिकेने खूप प्रभावित झाली होती. त्यानंतर तिने माधुरीसारखे बनण्याचे ठरवले.
सोशल मीडियावर विद्या बालनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती म्हणते, "मी सातवीत होते तेव्हापासून मला अभिनेत्री व्हायचे होते. मला माहिती नाही चूक होते की बरोबर पण तेव्हा तेजाब मधील माधुरीच्या भूमिकेने मी खूप प्रेरित झाले होते. तो सिनेमा इतका छान होता की देशभरातील मुलींना माधुरीसारखे बनायचे होते. तथापि, मी तिच्यासारखी बनू शकले नाही. मात्र ईश्वराच्या कृपेने मला कमीतकमी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळली.
एन. चंद्रा यांच्या तेजाब या चित्रपटाने माधुरीला रातोरात स्टार बनवले होते. हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला होता. अलीकडेच विद्या बालनने 'भूल भुलैया ३' मध्ये माधुरीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटात विद्याने मंजुलिकाची भूमिका निभावली आहे तर माधुरी मंदीराच्या भूमिकेत दिसली आहे.
'भूल भुलैया ३' मध्ये माधुरी दीक्षित, विद्या बालन, कार्तिक आर्यन, तृप्ती डीमरी, राजपाल यादव अशी तगडी स्टार कास्ट आहे. १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी टक्कर असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाबद्दल मिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.