डेटिंगवर पैसे खर्चणाऱ्या मुली मूर्ख !

बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन कोणत्याही मुद्द्यावर आपले रोखठोख मत मांडण्यासाठी ओळखल्या जातात.

 JayaBachchan

डेटिंगवर पैसे खर्चणाऱ्या मुली मूर्ख !

त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. आता त्यांनी डेट करणाऱ्या मुलामुलींवर निशाणा साधला आहे. जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट शो व्हॉट द हेल नव्याच्या दुसऱ्या सीझनच्या नवीन भागात यावर भाष्य केले. या एपिसोडमध्ये नेहमीप्रमाणे जया आपली मुलगी श्वेता नंदासोबत आल्या होत्या.नव्या नवेली नंदाने स्त्रीवादावर भाष्य केले आणि महिलांना आता अधिक सक्षम दिसत असल्याचे सांगितले. त्यांना अनेक गोष्टी स्वतंत्रपणे करायच्या असतात असे नव्या म्हणाली. त्यानंतर तिने उदाहरण दिले की, जर तुम्ही एखाद्या मुलीला डेटवर घेऊन गेलात आणि तुम्ही बिल भरतो असे म्हटले, तर काहीजणी यामुळे नाराज होतात, कारण महिलांना वाटते की बिल भरण्यासाठी त्याही सक्षण आहेत आणि त्या गोष्टीचा त्यांना समान अधिकार आहे. पण नव्याला मध्ये थांबवत जया बच्चन म्हणाल्या की, ज्या महिला हे करतात त्या मूर्ख आहेत. त्या म्हणाल्या की, 'किती मूर्ख आहेत त्या महिला ज्या बिलाची विभागणी करतात. त्यापेक्षा त्यांनी पुरुषांना बिल भरायला द्यायला हवं.त्यानंतर नव्याने आजी जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांना विचारले की त्यांच्या काळात आणि आजच्या काळात पुरुषांमध्ये काही बदल झाला आहे का? म्हणजे त्यांच्या काळात ते कसे होते आणि आज कसे आहेत? यावर नव्याची आई श्वेता बच्चन नंदा म्हणाली, 'आमच्या काळात पुरुषाने मजबूत असावे आणि गप्प राहावे, असा समज होता. आपण डेटिंग करत असताना देखील, आपण त्या व्यक्तीची वाट पाहिली पाहिजे. तोच तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला प्रपोज करेल. जया यांनी देखील हे मान्य केले आणि तिलाही तेच पटते असे सांगितले. त्या म्हणाल्या, 'पुरुषाने आधी प्रपोज केले तर बरे होईल. अन्यथा, मला खूप विचित्र वाटेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story