शोभिताची इच्छा!
आता ती हॉलिवूडमध्ये एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा असून त्यातच तिने मातृत्वाविषयी केलेल्या विधानाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शोभिताने म्हटले आहे की, मी प्रामाणिकपणे सांगते की, आता मला ज्या अनुभवाचे वेध लागले आहेत ते मातृत्वाचे. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा ते माझ्यासाठी खूपच आनंददायी असेल. मी त्या क्षणाची वाट पाहात आहे. दुसरीकडे शोभिताचं नाव नागा चैतन्यसोबत जोडलं जात असताना तिनं केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी शोभिता नागा चैतन्यसोबतच्या डेटिंगबाबत म्हणाली होती की, जे लोकं कोणत्याही माहितीविना बोलतात, त्यांना उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. मी कोणतही चुकीचं काम करत नाही तोपर्यंत मला कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.
शोभिता धूलिपाला ही हॉलिवूडमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता देव पटेलच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असणाऱ्या द मंकी मॅनमध्ये शोभिता दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिची खास भूमिका असेल. ही एक ॲक्शन फिल्म असून या चित्रपटाच्या निमित्तानं देव पटेल दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. ही फिल्म जॉर्डन पील यांच्या मंकी पॉ आणि युनिव्हर्सलतर्फे प्रदर्शित केली जाणार आहे. त्यात मकरंद देशपांडे, सिकंदर खेर, शार्ल्टो कोपले, पितोबाश, विपिन शर्मा, आदिती कालकुंटे आणि अश्विनी काळसेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मंकी मॅनची निर्मिती ही देव पटेल, जोमन थॉमस, जॉर्डन पील यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक चित्रपटाची वाट पाहात आहेत. शोभिताच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास ती झोया अख्तर आणि रीमा कागतीच्या मेड इन हेवन नावाच्या सीरिजमध्ये दिसली होती. त्या मालिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. त्याच्या दोन्ही सीझनमध्ये ती दिसली होती. यानंतर शोभिता ही नाईट मॅनेजर आणि मॅन राघव २.० आणि कालाकांडी नावाच्या चित्रपटात दिसली होती. यापुढील काळात ती आलिया भट्टच्या जिगरा नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचे दिग्दर्शन वासन बाला यांचे आहे. गेल्या काही दिवसांपासून शोभिता आणि नागा चैतन्यच्या डेटिंगची जोरदार चर्चा रंगली असून त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत. तिच्या आताच्या विधानानंतर मात्र वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.