देसी गर्ल प्रियांका प्रथमच मालतीसमवेत !
अभिनयाच्या जागतिक कॅनव्हासवर आपले नाव दमदारपणे कोरणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता मातृत्वाच्या पर्वातून जात आहे. गेल्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून मातृत्वाला सामोरे जाणारी प्रियांका आई झाल्याचे सोशल मीडिया अधे-मधे दाखवून देत असते. हॉलिवूड वॉक ऑफ द फेम कार्यक्रमात जोनाज ब्रदर्सचा विशेष सहभाग होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी प्रियांका आली होती. कधी नव्हे ते तिने आपली कन्या मालती मेरीबरोबरचा सेल्फी इस्टाग्रामवर टाकला आहे. रविवारी सकाळी प्रियांकाने टाकलेल्या फोटोमध्ये ती आणि मालती दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका पती जोनसह बेडवर बसली असून मालती जोनसमवेत आहे. या फोटोला प्रियांकाने डेज लाईक धीस अशी कॅप्शन दिली आहे. प्रियांकाचा आगामी चित्रपट लव्ह अगेन लवकरच येत असून त्यात तिच्याबरोबर सॅम ह्युगेन काम करत आहे. प्राईम व्हीडीओवर प्रियांकाची सिटाडेल ही मालिका लवकरच येत असून त्यात तिच्याबरोबर रिचर्ड मॅड्डेन काम करत असून त्याचे दिग्दर्शन पॅट्रीक मॉर्गन करत आहे. विज्ञान कथेवर आधारलेली ही मालिका लवकरच चाहत्यांच्या भेटीला येईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.