अनुराधा पौडवाल यांचा 'उजवा' राग

सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आता भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

अनुराधा पौडवाल यांचा 'उजवा' राग

सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आता भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करुन आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपत प्रवेश करताना त्यांनी 'जय श्रीराम'चा नाराही दिला आहे. अनुराधा पौडवाल या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतल्या प्रसिद्ध गायिका आहेत. तसेच त्यांनी अनेक भक्तिगीतेही गायली आहेत.

“जय श्रीराम! मी आज भाजपची सदस्य झाली आहे. मला आज खूप आनंद झाला आहे. कारण मी आज त्या सरकारशी जोडली गेले आहे ज्या सरकारचे नाते  सनातन धर्माशी आहे. मागच्या ३५ वर्षांहून अधिक काळ मी भक्तिगीते गात आहे. सुरुवातीला मी सिनेसृष्टीतही गायले, त्यानंतर मी भक्तिगीतेच म्हणते आहे. मला अनेकदा वाटायचे की मी घेतलेला हा निर्णय योग्य की अयोग्य. मात्र समाधान या गोष्टीचे आहे की रामलल्लाची स्थापना झाली तेव्हा मला तिथे पाच मिनिटांसाठी गाणे म्हणता आले. त्यामुळे माझा निर्णय योग्यच होता. गंगा नदीची आरती माझ्याच आवाजातली आहे जी सकाळ-संध्याकाळ होते. या सगळ्या भक्तिगीतांवर कळस चढवण्याचे काम रामलल्लासमोर म्हटलेल्या भजनामुळे झाले. मला त्यावेळी खूप समाधानी वाटले. कारण माझे स्वप्न पूर्ण झाले. मी भाजपत आले हे माझे भाग्य आहे तुम्हा सगळ्यांचे आभार, असे अनुराधा पौडवाल यांनी म्हटले आहे.

अनुराधा पौडवाल या हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी गाणे म्हणणाऱ्या उत्तम पार्श्वगायिका आहेत. मात्र मागील ३५ वर्षांपासून त्या भक्तिगीते गात आहेत. टी सीरिज या गुलशन कुमार यांच्या कंपनीत त्या गाऊ लागल्या आणि त्यानंतर त्यांनी भक्तिगीतेच गायली. कॅसेटचा जमाना होता त्या काळात अनुराधा पौडवाल या भक्तिगीतांसाठीच ओळखल्या जात. 

६९ वर्षीय अनुराधा पौडवाल या ९० दशकातील आपल्या भक्तीगीतांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचे लग्न १९६९ मध्ये अरुण पौडवाल यांच्यासोबत झाले होते. अरुण पौडवाल हे एस.डी. बर्मन यांचे असिस्टंट आणि म्यूझिक कंम्पोझर होते. त्यांना आदित्य नावाचा मुलगा आणि कविता नावाची एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. १९९१ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले होते. 

अनुराधा पौडवाल यांनी विविध भाषांमध्ये गीते गायिली आहेत. भाजपसोबत त्या राजकीय कारकीर्द सुरु करु पाहात आहेत. लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत. त्याआधी भाजपमध्ये इनकमिंग वाढली आहे. अनुराधा पौडवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व भाजपसोबत आले आहे. पण, भाजप त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का? किंवा पुढे त्यांना संधी देण्यार हे पाहावे लागणार आहे. तुर्तास यावर सस्पेंस कायम आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest