सिगारेट ओढायला वडिलांनी शिकवले; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला किस्सा

मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच सुप्रिया पाठारे. सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) सध्या ‘नाच गं घुमा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहेत.

Supriya Pathare

सिगारेट ओढायला वडिलांनी शिकवले; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला किस्सा

मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच सुप्रिया पाठारे. सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) सध्या ‘नाच गं घुमा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहेत. चित्रपटाच्या प्रमोशन्सदरम्यान त्या अनेक मुलाखतींमध्ये दिसत आहेत. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली. अनेक किस्से, चित्रपटातील धमाल-मस्ती, आयुष्यातले अनुभव अशा अनेक गोष्टी त्यांनी या मुलाखतीत शेअर केल्या आहेत.

सुप्रिया पाठारे यांनी या मुलाखतीत वडील आणि त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं. एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना सिगारेट ओढायला शिकवले होते. हा अनुभव शेअर करताना सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “मी जेव्हा ‘लग्नाची बेडी’ नाटकात काम करीत होते तेव्हा सिगारेट कशी ओढायची हे माझ्या वडिलांनी मला शिकवले होते. कारण- मला माहीतच नव्हते की ती कशी पकडायची, ती ओढायची स्टाईल कशी असली पाहिजे. कारण- मी कधीच सिगारेट ओढली नव्हती. माझे वडील मला गावच्या देवळाच्या मागे घेऊन गेले आणि तिथे त्यांनी मला सिगारेट ओढायला शिकवले आणि आईने तेवढ्यात आम्हाला बघितले आणि आई वडिलांना म्हणाली की, अहो हे काय त्या कार्टीला शिकवताय. तुम्ही तर बिघडला आहातच; तिलापण बिघडवताय. वडील मुलीला सिगारेट ओढायला शिकवतायत हे बघायला आणि ऐकायला किती भयानक वाटत असेल. माझी आई तर खूप घाबरली होती. ती सतत म्हणायची, अरे देवा, बापच मुलीला सिगारेट ओढायला शिकवतोय. पण, त्यांना माहीत होते की हे नाटकासाठी आहे आणि त्यानंतर मी कधीच सिगारेट नाही ओढली. म्हणजे मला तसे वाटले नाही की, बघूया ना सिगारेट ओढून कसे वाटते ? मला कोणतेच व्यसन नव्हते. मला फक्त एकच व्यसन आहे आणि ते म्हणजे खाणे व फिरणे. ही माझी दोन व्यसने आहेत.

दरम्यान, सुप्रिया पाठारे यांचा आगामी चित्रपट ‘नाच गं घुमा’ १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासह मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सारंग साठे, मायरा वायकुळ, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर हे कलाकार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story