Ayesha Khan : अनेकदा छेडछाड! मी घाबरली आणि थरथरत...

मागील वर्षी पार पडलेल्या ‘बिग बाॅस सिझन १७’ मध्ये सहभागी होऊन चर्चेत आलेली माॅडेल आणि अभिनेत्री आएशा खान (Ayesha Khan) हिने अलीकडे छेडछाडप्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आएशाने सांगितले की, तिला अनेकदा छेडछाडीचा सामना करावा लागला आहे.

Ayesha Khan

अनेकदा छेडछाड! मी घाबरली आणि थरथरत...

मागील वर्षी पार पडलेल्या ‘बिग बाॅस सिझन १७’ मध्ये सहभागी होऊन चर्चेत आलेली माॅडेल आणि अभिनेत्री आएशा खान (Ayesha Khan)  हिने अलीकडे  छेडछाडप्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आएशाने सांगितले की, तिला अनेकदा छेडछाडीचा सामना करावा लागला आहे.

एका मार्केटिंग एजन्सीसाठी फोटोशूट करताना तिच्याकडे चुकीची मागणी करण्यात आली होती. तिला जाळीदार कपडे घालण्यास सांगण्यात आले. आयशाला ते कपडे घालणे अजिबात सोयीचे नव्हते. त्या कपड्यांमुळे तिचे शरीर उघडे पडले असते. रस्त्याने चालत असतानाही अनेकदा तिच्यासोबत छेडछाड झाल्याचे आएशाने सांगितले. तिच्या वडिलांच्या वयाच्या एका व्यक्तीने तिच्या शरीरावर अश्लील टिप्पणी केली होती.

‘बिग बॉस-१७’ ची स्पर्धक असलेल्या आएशाने सांगितले की, ‘‘करिअरच्या सुरुवातीला मला मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला फोटोशूटसाठी काही कपडे दिले. मी खूप उत्साहात होतो. त्यांनी मला घालायला काळ्या जाळीचे कापड दिले. मला वाटले की मला त्याच्या आतदेखील काहीतरी घालावे लागेल. कारण जाळीच्या फॅब्रिकमध्ये शरीर कुठेतरी दिसेल,  मात्र तसे नव्हते. मला कामुक आणि आकर्षक दिसण्यासाठी आत काहीही घालू नका, असे सांगण्यात आले. असे केल्याने माझे माझे शरीरर उघडे पडले असते. मी याला नकार दिला असता एजन्सीचे लोक म्हणाले, ‘प्रत्येकजण असे करतो. इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या नावांनी हे काम केले आहे.’ मात्र तरीही मी याला नकार दिला. मला स्वत:ला अशा स्थितीत ठेवायचे नाही, जिथे मला तडजोड करावी लागेल. माझी एक सीमा आहे जी मी ओलांडू शकत नाही. मला काम देऊ नका, पण तुम्ही माझे नशीब हिरावून घेऊ शकत नाही.’’

मुंबईत एकदा बदमाशांनी छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटनादेखील यावेळी आएशाने सांगितली. ‘‘एकदा मुंबईतील जुहू बीचवर काही बदमाश माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होते. कॉलवर कोणाशी तरी बोलत असल्यासारखा तो वागत होता. त्याच्या नजरेतील भाव आणि देहबाली पाहून मी घाबरली आणि थरथरत तिथून निघून गेली,’’ असे तिने सांगितले.

आएशा ही ‘बिग बॉस-१७’चा विजेता मुनव्ववर फारुकीसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत असते. आएशाने आणखी एका घटनेचा उल्लेख केला. आएशाने सांगितले की, एकदा ती तिच्या बिल्डिंगखाली फिरत होती. त्यानंतर तिच्या वडिलांच्या वयाच्या एका व्यक्तीने तिच्या शरीरावर अत्यंत अश्लील टिप्पणी केली. आएशाने सांगितले की, मध्यमवयीन व्यक्तीने तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली आणि हसत हसत पुढे सरकली. आएशा काहीच करू शकत नव्हती, फक्त नकळत बघत राहिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story