रणवीरचाही डीपफेक व्हीडीओ

आमिर खाननंतर आता अभिनेता रणवीरसिंगचा (Actor Ranveer Singh) डीप फेक व्हीडीओ (Deep fake video) व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये रणवीर विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करताना दिसत आहे. हा व्हीडीओ रणवीरच्या वाराणसी भेटीदरम्यानचा आहे. यामध्ये तो वाराणसी संबंधित त्याचे अनुभव शेअर करत होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sat, 20 Apr 2024
  • 04:34 pm
Ranveer Singh Deep fake video

रणवीरचाही डीपफेक व्हीडीओ

आमिर खाननंतर आता अभिनेता रणवीरसिंगचा (Actor Ranveer Singh)  डीप फेक व्हीडीओ (Deep fake video) व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये रणवीर विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करताना दिसत आहे. हा व्हीडीओ रणवीरच्या वाराणसी भेटीदरम्यानचा आहे. यामध्ये तो वाराणसी संबंधित त्याचे अनुभव शेअर करत होता. माॅर्फ केलेल्या व्हीडीओत तो ‘‘ विचार करा आणि मत द्या. आमच्या वेदना, बेरोजगारी आणि महागाई...  भारत आता अन्यायाच्या युगाकडे इतक्या वेगाने वाटचाल करत आहे... पण आपल्या विकासाची आणि न्यायाची मागणी करायला विसरता कामा नये. त्यामुळे विचार करून मतदान करा,’’ असे आवाहन करताना दिसतो.

रणवीरचा हा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या रविवारी वाराणसीतील नमो घाटावर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. रणवीर आणि क्रिती सॅनन हे त्याचे शो-स्टॉपर्स होते. शोपूर्वी रणवीर, क्रिती आणि मनीष या तिघांनीही श्री काशी विश्वनाथ धाम येथे पूजा केली होती. यावेळी त्यांनी चाहत्यांसोबत सेल्फी घेत ‘हर हर महादेव’चा नारा दिला. काही माध्यम वाहिन्यांना मुलाखतीही दिल्या. फॅशन शोनंतर रणवीरने क्रिती आणि डिझायनर मनीष मल्होत्रासोबतचा हा फोटो शेअर केला. यादरम्यान रणवीर आणि क्रिती यांनी गंगा नदीवर बोटीतून प्रवास केला. त्याच वेळचा हा व्हीडीओ मार्फ करून वापरण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानचा एक बनावट व्हिडिओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाला पाठिंबा देताना दिसत होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमिरने यावर प्रतिक्रिया दिली आणि मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देत नसून हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगितले. या प्रकरणी अभिनेत्याने सायबर सेलमध्ये एफआयआरही दाखल केला आहे.  आमिरचा हा व्हिडिओ त्याच्या दशक जुन्या 'सत्यमेव जयते' या शोच्या शूटिंगदरम्यान काढण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest