ऐश्वर्या राय एवढी दु:खी कशासाठी?

अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेली ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय नसते.

Aishwarya Rai

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री ऐश्वर्या (Aishwarya Rai) राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेली ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय नसते. पण खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता देखील ऐश्वर्या हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन वडील कृष्णराज राय यांच्या खूप जवळ होती. अभिनेत्री कायम वडिलांच्या आठवणी ताज्या करताना दिसते. या अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन २०१७ मध्ये झाले. अभिनेत्री कायम वडिलांच्या आठवणीत फोटो पोस्ट करत असते. आता पुन्हा एकदा ऐश्वर्याने तिच्या वडिलांसाठी एक पोस्ट केली आहे.

१९ मार्च २०२४ रोजी ऐश्वर्या रायच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. यावेळी ‘माजी मिस वर्ल्ड’ने वडिलांच्या आठवणीत एक पोस्ट केली. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. पहिला फोटो ऐश्वर्याच्या वडिलांच्या फोटो फ्रेमचा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्याचे वडील नात आराध्या बच्चन हिचे लाड करताना दिसत आहेत. खास फोटो पोस्ट करत ऐश्वर्या हिने भावुक कॅप्शनदेखील लिहिली आहे. ‘माझे प्रिय डॅडी आणि अज्जा… मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करते… तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, चाहतेदेखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवाय ऐश्वर्या हिने सासूबाई जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या मदभेदांमुळे अभिनेत्रीने सासर सोडल्याची देखील चर्चा रंगली. पण यावर कोणीही अधिकृत वक्तव्य केले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story