Urmila Matondkar : ऊर्मिला 'सॉफ्ट' पॉर्नस्टार कशी?

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) लढत असलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सध्या चर्चेत आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinet) आणि कंगनामध्ये सध्या मोठा वाद सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 27 Mar 2024
  • 05:22 pm
Urmila Matondkar

संग्रहित छायाचित्र

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) लढत असलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सध्या चर्चेत आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinet) आणि कंगनामध्ये सध्या मोठा वाद सुरू आहे. सुप्रिया श्रीनेत  यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कंगनाबाबत अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. त्यानंतर कंगनाने त्या पोस्टला सडेतोड उत्तर दिले. अशातच सुप्रिया श्रीनेत आणि कंगना यांच्या सोशल मीडियावरील वादादम्यान कंगनाचा एक जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

कंगनाचा एक जुना व्हीडीओ दाऊद नदाफ यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडीओमध्ये कंगना ही ऊर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हणताना दिसत आहे. व्हीडीओला कॅप्शन देण्यात आले, जेव्हा कोणीतरी सुप्रिया श्रीनेतजी यांचे खाते हॅक केले आणि त्याद्वारे कंगना रानौतबद्दल काही बोलले गेले तेव्हा संपूर्ण गोदी मीडियाने गोंधळ सुरू केला, पण काही दिवसांपूर्वी याच कंगना रानौतने काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटले होते. यावर कंगना रानौतला माफी मागायला सांगितली होती?

या सगळ्या प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी ऊर्मिला मातोंडकरला कंगना सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होती त्याची आठवण करून दिली आहे. कंगनाच्या मुलाखतीचा तो अंश लोक एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत आहेत आणि तू ऊर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस त्याचे काय? असे विचारत आहेत.

#उर्मिलामातोंडकर हा हॅशटॅगही नेटकऱ्यांनी ट्रेंड केला आहे. मासूम, भूत, प्यार तुने क्या किया, पिंजर, एक हसीना थी हे चित्रपट ऊर्मिलाच्या सशक्त अभिनयाचा पुरावा आहेत, असे झीनत नावाच्या एका यूजरने म्हटले आहे. कंगना तू ऊर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस विसरलीस का? असाही प्रश्न एका यूजरने विचारला आहे. जे आत्ता कंगनाबाबत पोस्ट केली म्हणून गळा काढत आहेत त्यांनी कंगनाचा ऊर्मिलाबाबतच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही, असा प्रश्न एका यूजरने विचारला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story