आदिती राव हैदरी दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर!

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरी यांचे लग्न झाल्याची चर्चा जोरात होती. अदिती अलीकडे बाॅलिवूड चित्रपटांत दिसत नसली तरी तिच्या प्रेमात असलेले अनेक चाहते आहेत. त्यामुळे तिच्या कथित लग्नाबाबत खूप चर्चा झाली.

संग्रहित छायाचित्र

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरी यांचे लग्न झाल्याची चर्चा जोरात होती. अदिती अलीकडे बाॅलिवूड चित्रपटांत दिसत नसली तरी तिच्या प्रेमात असलेले अनेक चाहते आहेत. त्यामुळे तिच्या कथित लग्नाबाबत खूप चर्चा झाली. मात्र, खुद्द अदितीने सोशल मीडियावर पोस्ट करून ‘लग्न नव्हे, एंगेजमेंट झाली आहे,’ असा खुलासा केला. अदिती आणि सिद्धार्थ लग्नाबद्दल येत्या काळात लवकरच निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. या दोघांचेही पहिले लग्न अपयशी ठरले होते.

 तेलंगणातील श्री रंगनायक स्वामी मंदिरात अदिती आणि सिद्धार्थ या दोघांचा विवाह झाल्याचे वृत्त आधी समोर आले होते. मात्र, त्याचे फोटो समोर आले नव्हते. सिद्धार्थ आणि अदिती लवकरच लग्न झाल्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, खुद्द अदितीनेच लग्न झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. यासोबत तिने सिद्धार्थसोबत एंगेजमेंट झाल्याचेही कळवले.  

दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सिद्धार्थ आणि आदितीने २०२१ मध्ये तामिळ-तेलुगू चित्रपट महासमुद्रममध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून या दोघांमधील जवळीक वाढली. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत.

सिद्धार्थने ‘रंग दे बसंती’ आणि ‘चश्मेबद्दूर’ यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अदिती ही दक्षिण आणि हिंदी चित्रपटांची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘पद्मावत,’ ‘बॉस,’ ‘रॉकस्टार’ आणि ‘मर्डर-३’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

३७ वर्षीय अदिती ही वडिलांकडून हैदराबादच्या निजाम तर वडिलांकडून तेलंगणातील वानापर्थी राजघराण्याशी संबंधित आहे. अदितीने तिच्या करिअरची सुरुवात भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून केली होती. त्यांनी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना लीला सॅमसन यांच्या नृत्य गटातही काम केले. येथे काम केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली. २००७ मध्ये आलेल्या ‘श्रुंगाराम’ या तमिळ चित्रपटात तिने पहिल्यांदा काम केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story