'तू तुझ्या निरागस पतीची का फसवणूक केली’; ट्रोलरच्या प्रश्नावर समंथाचे सडेतोड उत्तर म्हणाली...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला. २०२१ मध्ये ती पती नाग चैतन्यपासून विभक्त झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Fri, 12 Apr 2024
  • 05:25 pm
Samantha Ruth Prabhu)

'तू तुझ्या निरागस पतीची का फसवणूक केली’; ट्रोलरच्या प्रश्नावर समंथाचे सडेतोड उत्तर म्हणाली...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला. २०२१ मध्ये ती पती नाग चैतन्यपासून विभक्त झाली. त्यानंतर काही महिन्यांनी तिला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचे निदान झाले. मध्यंतरीच्या काळात समंथाने कामातून सहा महिन्यांचा ब्रेकसुद्धा घेतला होता. आता पुन्हा एकदा ती सक्रिय झाली आहे. नुकताच तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर आरोग्याशी संबंधित पॉडकास्ट सुरू केला आहे. मात्र घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतरही समंथाला ट्रोल करणे थांबलेले नाही. तिच्या पॉडकास्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका यूजरने तिला नाग चैतन्यबाबत खोचक प्रश्न विचारला. त्यावर समंथानेही सडेतोड उत्तर दिले आहे. तिचे उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

समंथा तिच्या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये मॉर्निंग रुटिनविषयी सांगताना दिसतेय. सकाळी उठल्यापासून ती काय काय करते, याबद्दल ती सांगते. आरोग्याशी संबंधित पॉडकास्ट असतानाही या एपिसोडच्या कमेंटमध्ये एका यूजरने समंथाला तिच्या पूर्व पतीबद्दल प्रश्न विचारला. ‘मला सांग, तू तुझ्या निरागस पतीची का फसवणूक केली’, असा सवाल संबंधित यूजरने केला. त्यावर समंथाने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सचे तोंड गप्प केले आहे.

समंथाने लिहिले  ‘माफ करा, पण या सवयी तुमच्या कामी येणार नाहीत. तुम्हाला यापेक्षा आणखी काहीतरी मजबूत उपायांची गरज आहे. तुम्हाला शुभेच्छा.’ समंथा तिच्या पॉडकास्टमध्ये योग साधना आणि प्राणायाम याविषयी सांगत होती. त्यामुळे त्याचा संदर्भ देत तिने यूजरला हे उत्तर दिले. समंथा आणि नाग चैतन्य २०१० पासून एकमेकांना डेट करू लागले होते. ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर २९ जानेवारी २०१७ रोजी दोघांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघे लग्नबंधनात अडकले. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले. २ ऑक्टोबर २०२१ रोजी समंथाने सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर केला होता.

याआधी इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान एका यूजरने समंथाला पुन्हा एकदा लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला होता. ‘तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करतेय का’, असे संबंधित यूजरने तिला विचारले होते. त्यावर उत्तर देताना समंथाने लिहिले होते, ‘घटस्फोटाची आकडेवारी पाहता ही वाईट गुंतवणूक ठरेल.’ इतकेच नव्हे तर या उत्तरात समंथाने घटस्फोटाचे प्रमाण सांगणारा डेटासुद्धा पोस्ट केला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story