मला माझा भूतकाळ कधीही विसरता येणार नाही - सनी लिओनी

सनी लिओनी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. सनी लिओनीने २०११ मध्ये सलमान खानच्या 'बिग बॉस ५' मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. या लोकप्रिय, वादग्रस्त कार्यक्रमाच्या माध्यमातून सनी लिओनी घराघरांत पोहोचली. पुढे 'जिस्म २' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Tue, 14 May 2024
  • 05:52 pm

संग्रहित छायाचित्र

सनी लिओनी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. सनी लिओनीने (Sunny Leone) २०११ मध्ये सलमान खानच्या 'बिग बॉस ५' मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. या लोकप्रिय, वादग्रस्त कार्यक्रमाच्या माध्यमातून सनी लिओनी घराघरांत पोहोचली. पुढे 'जिस्म २' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  बॉलिवूड गाजवण्याआधीही सनी लिओनी चर्चेत आली होती. अमेरिकेत ती पॉर्न स्टार होती. सनीची स्वत:ची निर्मितीसंस्था होती. सनीला हिंदी मनोरंजनसृष्टीत एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणे सनीसाठी फार महत्त्वाचे होते.  सनीने अमेरिकेतल्या फिल्म इंडस्ट्रीत १० वर्षे घालवली आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतरही तिला प्रवास सोपा नव्हता. २००२-२००३ दरम्यान तिने अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटांची ती स्टार झाली होती.

सनीने एका मुलाखतीत आपल्या भूतकाळाबद्दल भाष्य केले आहे. मला माझा भूतकाळ कधीही विसरता येणार नाही, असं ती म्हणाली. भूतकाळामुळे अनेकदा तिला ऑकवर्ड सिचुएशनचा सामना करावा लागला आहे. मी माझ्या बदनाम भूतकाळाला कधीच विसरणार नाही. आज मी या भूतकाळामुळेच यश मिळवू शकले आहे. स्वत:च्या मर्जीने मी कामे निवडली आहेत. माझी दु:खी स्टोरी नाही. माझी गोष्ट वाचून कोणालाही दया येणार नाही. मला कोणीही जबरदस्ती केलेली नाही. माझा आतापर्यंतचा प्रवास चढउतारांचा होता. मी भारतात आल्यानंतर लोक माझ्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहायचे.

गेल्या अनेक वर्षांपासून सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर काही चित्रपटांमध्ये तिचे आयटम सॉन्ग असतेच. सनी लिओनी ज्या गाण्यावर थिरकते ते सुपरहिट होते.  सनी लिओनी आयुष्यात यशस्वी झालेली आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. कोणी तुम्हाला खाली पाडत असेल तर घाबरून न जाता पुन्हा उभे राहायला हवे तरच यश मिळेल. लोकांचा विचार मी करत बसले असते तर कधीच यशस्वी झाले नसते. सनी लिओनीच्या चमकदार आयुष्याच्या मागचे सत्य आहे की, ती कधीच सत्य नाकारत नाही. त्यापासून पळ काढत नाही. सनी लिओनीची हीच सुंदरता इतरांसाठी फायदेशीर ठरते. सनीच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story