महानायक अमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा झटका? कोकिलाबेन रुग्णालयात अँजियोप्लास्टी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची अँजियोप्लास्टी झाल्याची बातमी समोर आली आहे. ८१ वर्षीय बिग बी यांना शुक्रवारी सकाळी ६ वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संग्रहित छायाचित्र

कोकिलाबेन रुग्णालयात अँजियोप्लास्टी झाल्याचे वृत्त

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची अँजियोप्लास्टी झाल्याची बातमी समोर आली आहे. ८१ वर्षीय बिग बी यांना शुक्रवारी सकाळी ६ वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथेच सर्जरी पार पडल्याची बातमी आहे. याबाबत अद्याप इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आपल्या सिनेमांमुळे कायम चर्चेत असलेले बिग बी आज आरोग्याच्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest