मलंग, राझी नंतर अमृता खानविलकर दिसणार या हिंदी बॉलिवुड सीरिज मध्ये !

वेब विश्वातून अमृता खानविलकर करणार प्रेक्षकांचं मनोरंजन म्हणून अमृता साठी " लुटेरे " आहे खास !

मलंग, राझी नंतर अमृता खानविलकर दिसणार या हिंदी बॉलिवुड सीरिज मध्ये !

अमृता खानविलकर " लुटेरे " मध्ये साकारणार " अविका " ची भूमिका

मराठी आणि बॉलिवुड इंडस्ट्रीत कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर ! अमृता कायम विविध गोष्टी मधून चर्चेत असते मग ते सोशल मीडिया वरचे तिचे फॅशनेबल फोटो असो किंवा विविधांगी भूमिका अमृता नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.  आजवर अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून अमृता दिसली आहे आणि लवकरच ती " लुटेरे " या नव्या कोऱ्या हिंदी वेब सीरिज मधून पुन्हा एकदा बॉलिवुड मध्ये झळकणार आहे. 

अमृताने आजवर बॉलिवुड मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केलं आणि पुन्हा एकदा ती नव्या बॉलिवुड प्रोजेक्ट साठी सज्ज झाली आहे. हा नवा प्रोजेक्ट तिच्या साठी खूप खास आहे आणि त्याच कारण देखील तितकच खास आहे. " लुटेरे " मध्ये अमृता अनेक दिग्गज बॉलिवुड मधल्या कलाकारांच्या सोबतीने दिसणार आहे. 

लुटेरे बद्दल बोलताना अमृता म्हणते " खूप दिवसांनी एक क्राईम थ्रिलर वेब सीरिज मध्ये काम करताना खूप आनंद होतोय. सोबतीने हंसल सर आणि जय मेहता यांच्या सोबतीने काम करण्यची अनोखी संधी मिळाली आहे. 2024 वर्षातला माझा हा पहिला हिंदी प्रोजेक्ट असून एवढ्या कमालीच्या कलाकारांसोबत काम करण्याचा योगायोग सुद्धा जुळून आला " 

स्कॅम १९९२ आणि  स्कूप सारख्या सुपरहीट वेबसीरिज देणाऱ्या हंसल मेहता यांच्या आगामी ‘लुटेरे’ या वेब सीरिजचा अमृता एक महत्त्वपूर्ण भाग होणार असून मराठी इंडस्ट्री साठी हि बाब नक्कीच अभिमानास्पद आहे. याच दिग्दर्शन कमल जय मेहता करत असून डिस्ने प्लस हॉटस्टार वर येत्या 22 मार्च ला ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये अमृता खानविलकर सोबत रजत कपूर, विवेक गोंबर आणि आमिर अलीसारखे दमदार कलाकार झकाळणार आहेत.

आगामी काळात अमृता " लुटेरे " च्या सोबतीने "कलावती" , " पठ्ठे बापूराव " " ललिता बाबर " या सारख्या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. 2024 वर्षात अमृता विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार यात शंका नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest