'आ रहे हैं अटल बिहारी'

अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या ‘मैं अटल हूं’ हा सिनेमा जानेवारी महिन्यात तयार झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Wed, 13 Mar 2024
  • 06:53 pm

'आ रहे हैं अटल बिहारी'

हा चित्रपट अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. आता या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ‘मैं अटल हूं’ हा सिनेमा कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार, याची उत्सुकता आहे.  झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी, 'मैं अटल हूं' हा सिनेमा १४ मार्च रोजी रिलीज होणार आहे.

पंकज त्रिपाठी यांच्या या चित्रपटात पियूष मिश्रा, दया शंकर पांडे, राजा सेवक, एकता कौल यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. सिनेमाचे निर्माते विनोद भानुशाली यांनी या सिनेमाबद्दल सांगितले की, एक प्रेरणादायी व्यक्ती आणि तीनदा भारताचे पंतप्रधानपद भूषवलेले अटलबिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास आणि वारसा जिवंत करण्यात आम्ही यशस्वी ठरलो याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. पंकज त्रिपाठी आणि रवी जाधव यांच्यासह अशा प्रतिभावान व्यक्तींसोबत काम करण्याची संधी लाभली ही सिनेमाची आणखी एक जमेची बाजू!

या प्रकल्पासाठीचे आमचे एकत्रित समर्पण आणि उत्कटता प्रेक्षकांना नक्कीच जाणवेल. आता झी-५ च्या वर्ल्ड डिजिटल प्रीमियरद्वारे आम्ही जगभरातील आणखी अनेक प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करू ही आशा करतो. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लेजंड स्टुडिओज बॅनरखाली विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांची निर्मिती असलेला हा सिनेमा अटलबिहारी वाजपेयी यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतो. या सिनेमाचा जागतिक डिजिटल प्रीमियर १४ मार्च रोजी खासकरून झी-५ वर होईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest