संग्रहित छायाचित्र
ग्रॅमी-विजेत्या कोलंबियन गायिका शकीरा (Shakira) हिचे मूळ गाव बॅरनक्विला येथे तिचा पुतळा उभारण्यात आला आहे. बेली-डान्सिंग पोझमध्ये ६.५ मीटर (२१-फूट) उंचीचा कांस्य पुतळ्याच्या अनेकांचे लक्ष्य वेधून घेतो आहे. ग्रॅमी-विजेत्या कोलंबियन गायिका शकीरा हिचे मूळ गाव बॅरनक्विला येथे तिचा पुतळा उभारण्यात आला आहे. मेयर जैमे पुमारेजो यांनी मॅग्डालेना नदीकाठी एका उद्यानात, शकीराची प्रसिद्ध बेली-डान्सिंग पोझ कॅप्चर करून हे स्मारक शिल्प स्थानिकांच्या सहभागातून उभारले. या वेळी शकीराचे पालक आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शकीरा ही पॉप गायक आहे. तिची गाणी जगभरात ऐकली जातात. परिणामी ती सुद्धा प्रचंड प्रसिद्ध आहे.
कलाकार यिनो मार्केझ यांनी बनवलेल्या या पुतळ्यामध्ये शकीरा तिच्या लांब, कुरळ्या केसांसह ओव्हरहेडसह बेली डान्स करत आहे. अॅल्युमिनीयमच्या चमकदार स्कर्टमध्ये डान्स पोझमध्ये शकीरा खूपच सुंदर दिसते आहे. महापौर पुमरेजो यांनी पुतळ्याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले ही, हा पुतळा अत्यंत महत्त्वाचा आहे. जो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल. हा पुतळ्याकडे पाहून कोणीही प्रेरणा घेऊ शकतात. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी हा पतळा अनेकांना प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले. शकीराच्या पुतळ्याशेजारी एक फलकही लावण्यात आला आहे. जो तिच्या कर्तृत्वाची प्रशंसा करतो. तसेच, लॅटिन ग्रॅमी पुरस्कार आणि तिने तिच्या बालपणापासून आतापर्यंत केलेल्या स्थानिक ते आंतरराष्ट्रीय कामगिरीचा आढावा या फलकात घेतल्याचे पाहायला मिळते. महापौर कार्यालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, मियामीमध्ये राहणाऱ्या शकीरा यांनी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आनंद व्यक्त केल्याचे म्हटले आहे. तसेच तिचे कायमचे घर बॅरनक्विला असेल असेही म्हटले आहे.