प्रचंड मेहनत आणि दडपणही !

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ २०२२ मध्ये दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट चांगलाच गाजला होता. प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी निभावली आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 22 Jul 2024
  • 03:53 pm
new movie, dharmavir 2, anand dighe, mukkam post thane, shiv sena, Pravin Tarde, Thane District Chief Anand Dighe

संग्रहित छायाचित्र

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ २०२२ मध्ये दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट चांगलाच गाजला होता. प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी निभावली आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तत्पूर्वी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सनातन हिंदू संस्थेचा मान आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशीतरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, अशा संवादासह 'धर्मवीर २'चा ट्रेलर सादर करण्यात आला. त्यानिमित्ताने आनंद दिघेंची भूमिका साकारलेल्या अभिनेता प्रसाद ओकने त्याला चित्रपट करताना काय अनुभव आला ते सांगितले आहे.

त्यामध्ये त्याला या चित्रपटाचा पहिला भाग आणि दुसरा भाग यांच्यात वेगळेपण आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने प्रत्युत्तरादाखल देताना प्रसाद म्हणाला की, पहिल्या इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जाण्यासाठी आपण अभ्यास करतो आणि मग दुसरीतून तिसरीत जाण्यासाठी जास्त अभ्यास करतो.  चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या दुप्पट प्रतिसाद दुसऱ्या भागाला मिळायला हवा यासाठी आम्ही दुप्पट मेहनत घेतली आहे. आता प्रेक्षकांच्या हातात सर्वकाही आहे

. आनंद दिघेंची भूमिका साकारताना प्रचंड दडपण आल्याचे सांगताना प्रसाद म्हणाला की, अशी भूमिका साकारताना प्रचंड दडपण असते.  कारण- आनंद दिघेंना देव मानणारी अनेक कुटुंब महाराष्ट्र अन् भारतात आहेत. शूटिंगच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो असताना खरोखर मी देव्हाऱ्यात आनंद दिघेंचा फोटो पाहिला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात ही व्यक्ती ज्या उंचीवर आहे, त्या माणसाची भूमिका करताना ती जबाबदारीने व विचारपूर्वक केली गेली पाहिजे. चित्रपटातून काय संदेश द्यायचा हा प्रश्न जरी लेखक-दिग्दर्शक यांचा असला तरी भूमिका त्या ताकदीने लोकांसमोर येण्यासाठी मी प्रचंड अभ्यास केला. ज्या त्रुटी माझ्याकडून पहिल्या भागात राहिल्या होत्या, त्या ‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाच्या निमित्ताने दूर केल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest