समर्थनाच्या मोर्चानंतर तरुणांची हुल्लडबाजी

नामांतराच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगर शहरात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले तर, महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आल्या आहेत. नामांतराच्या समर्थनात रविवारी शहरातील क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात आला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 20 Mar 2023
  • 01:36 pm
समर्थनाच्या मोर्चानंतर तरुणांची हुल्लडबाजी

समर्थनाच्या मोर्चानंतर तरुणांची हुल्लडबाजी

रस्त्यावरील होर्डिंग फाडले, बसची काचही फोडली

#छत्रपती संभाजीनगर

नामांतराच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगर शहरात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले तर, महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आल्या आहेत. नामांतराच्या समर्थनात रविवारी शहरातील क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी तरुणांची हुल्लडबाजीही पाहायला मिळाली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये निघालेल्या जनगर्जना मोर्चामध्ये काही हुल्लडबाजांनी औरंगाबाद नावाच्या फ्लेक्स आणि बोर्डची मोडतोड केली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातून औरंगपुरा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजातील लोक सहभागी झाले होते. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. औरंगपुरा येथे सभा होऊन समारोप झाल्यानंतर मोर्चातून परतताना काही हुल्लडबाज युवकांनी औरंगपुरा ते क्रांती चौकापर्यंत जिथे जिथे औरंगाबाद असा फलक फ्लेक्स आहे, तो त्यांनी फाडून मोडून टाकला. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील केली. तर निराला बाजार चौकात औरंगाबाद नाव लिहिलेली एक लोखंडी पाटी देखील तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच एका महाविद्यालयाच्या गेटजवळ लावलेला बॅनरदेखील फाडण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत, या तरुणांना पांगवून लावले.

नामांतराच्या समर्थनात काढण्यात आलेल्या मोर्चास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच मोर्चा संपल्यावरदेखील पोलिसांचा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही पोलीस बंदोबस्त कायम आहे. निराला बाजार, क्रांती चौक, औरंगपुरा चौकासह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest