जेवणाचं बिल मागितलं म्हणून वेटरला कारसोबत एक किलोमीटर फरफटत नेलं, बीडमधील धक्कादायक प्रकार

बीड: जेवणाच्या बिलाची मागणी करणाऱ्या वेटरला बिल देण्यास नकार देत गाडीबरोबर किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर वेटरला मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले. ही घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 11 Sep 2024
  • 07:56 pm

जेवणाचं बिल मागितलं म्हणून वेटरला कारसोबत एक किलोमीटर फरफटत नेलं, बीडमधील धक्कादायक प्रकार

माजलगाव तालुक्यातील घटनेत वेटरला मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले

बीड: जेवणाच्या बिलाची मागणी करणाऱ्या वेटरला बिल देण्यास नकार देत गाडीबरोबर किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर वेटरला मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले. ही घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत घडली. 

या प्रकरणातील तीन मित्र हॉटेलवर जेवण करण्यास गेले होते. वेटरला बिल ऑनलाइन देतो , स्कॅनर घेऊन ये म्हणत ते गाडीत जाऊन बसले. त्यानंतर बिलाची मागणी करत गाडीजवळ आलेल्या वेटरला, बिल देण्यास नकार देत एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेण्यात आले. एवढेच नाहीतर त्यांनी त्याला मारहाण करत ओलीस ठेवले. 

मेहकर – पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखाराम मुंडे आणि अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते. त्यांनी तेथे यथेच्छ जेवण केले. त्यानंतर वेटर शेख साहिल अनुसुद्दीनला बिल घेऊन ये असं सांगितले. वेटरने बिल दिल्यानंतर, फोन पेचे स्कॅनर घेऊन ये म्हणत तिघेजण गाडीत जाऊन बसले.

वेटर स्कॅनर घेऊन गेला असता, कशाचे बिल म्हणत तिघांनी वाद घातला. तू, आम्हाला बिल का मागतोस, असे विचारत चालकाशेजारी बसलेल्या एकाने वेटरला दरवाजाच्या बाहेर पकडून थेट एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. निर्जन ठिकाणी गाडी थांबवत तिघांनी मारहाण करत वेटरच्या खिशातील ११ हजार ५०० रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. तसेच डोळ्याला पट्टी बांधून शनिवारी रात्रभर वेटरला गाडीमध्येच ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले.

या प्रकरणी शेख साहिल अनुसुद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून, सखाराम जनार्दन मुंडे आणि अन्य अनोळखी दोघांविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest