'संकेत बावनकुळेला अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी दिला चोप', सुषमा अंधारेंनी केला दावा

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या हिट अँड रन प्रकरणात दररोज नवनवीन आरोप होत आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी संकेत बावनकुळे आणि इतरांना पकडून चोप दिल्याचा दावा केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 12 Sep 2024
  • 02:12 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप, गाडीत असतानाही आरोपपत्रात नाव नसल्याचा दावा

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मुलाच्या हिट अँड रन प्रकरणात दररोज नवनवीन आरोप होत आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी संकेत बावनकुळे आणि इतरांना पकडून चोप दिल्याचा दावा केला आहे. अंधारे यांनी बुधवारी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. तसेच संकेत बावनकुळे गाडीत उपस्थित असतानाही त्याची वैद्यकीय तपासणी का झाली नाही? त्याचे नाव एफआयआरमध्ये का नाही? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

हिट अँड रन प्रकरणात (Nagpur Hit and Run Case) बावनकुळे यांच्या मुलाचे नाव घेतले गेल्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी कारमध्ये बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारी बसून होता, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितल्यानंतर या विषयी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आज सुषमा अंधारे याविषयी म्हणाल्या. रविवारी मध्यरात्री मानकापूर मार्गे कोराडीला जात असताना वाटेत काही वाहनांना संकेत बावनकुळे बसलेल्या कारने धडक दिली. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी संकेत बावनकुळे आणि इतरांना पकडून चोप दिला. आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र संकेत बावनकुळे वाहनासह पळून गेला. त्यामुळे रामदास पेठेत आणखी तीन वाहनांना धडक दिली. तीन वाहनांपैकी एक वाहन नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांचे होते. जितेंद्र सोनकांबळे यांनी रात्रीच एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही, असा आरोप अंधारे यांनी केला.

रविवारी मध्यरात्री संकेत बावनकुळे आणि त्याचे दोन मित्र अर्जुन जितेंद्र हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) धरमपेठमधील लाहोरी हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्री साडेबाराला ते ऑडी मोटारीतून बाहेर पडले. सेंट्रल बाजार रोडवरून भरधाव जाताना सेंटर पॉईंट हॉटेलसमोर त्यांनी जितेंद्र सोनकांबळे याच्या मोटारीसह तीन वाहनांना धडक दिली. अपघात झाला त्यावेळी संकेत दोन्ही मित्रांसह कारमध्येच होता. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार यांनाच ताब्यात घेतले. संकेतचे नाव एफआयरमध्ये नव्हते.

सीताबर्डी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर अंधारे पत्रकार परिषदेत म्हणाल्या, हिट अँड रन प्रकरणाची तक्रार दाखल करणाऱ्या फिर्यादीवर प्रचंड दबाव आहे. जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित जातीचे असून त्यांच्यावर दबाव आहे. मला त्यांच्या जिवाची काळजी वाटते. सोनकांबळे यांना पोलीस संरक्षण दिले गेले पाहिजे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest