महाराष्ट्रात गुंडाराज! बायको-मुलं ओरडत होती तो मात्र मारत राहिला; शिंदे गटातील आमदाराच्या बॉडीगार्डने भर रस्त्यात केली मारहाण?

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डने एका चारचाकी वाहन चालकाला दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. असा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केला आहे. ही घटना नेरळ येथे घडली असून या बाबतचा व्हिडीओ समाजमध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Wed, 11 Sep 2024
  • 05:55 pm

संग्रहित छायाचित्र

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (MLA Mahendra Thorave) यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डने एका चारचाकी वाहन चालकाला दांडक्याने बेदम मारहाण केली आहे.  असा गंभीर आरोप  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केला आहे. ही घटना नेरळ येथे घडली असून या बाबतचा  व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील दृश्य बघून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे.  

सध्या राज्यात सगळीकडून अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. विरोधकांनी देखील या मुद्द्याला धरून चांगलंच रान उठवल्याचं दिसत आहे. अशातच सत्ताधारी पक्षातील आमदारच्या  बॉडीगार्डने अशा प्रकारे मारहाण केल्याने समाजमाध्यमांतून चांगल्याच तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भर रस्त्यात चारचाकी मध्ये बसलेल्या चालकाला दांडक्याने बेदम मारहाण करताना दिसत आहे. कारमध्ये असलेली महिला ओरडत होती. मात्र मारणारा व्यक्ती चालकाला मारत राहिल्याचं दिसत आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shiv Sena Uddha Balasaheb Thackeray) हा व्हिडीओ एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.  महाराष्ट्रात गुंडाराज आल्याची टिका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवर केलेलं ट्विट: 
"महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही...  कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल!  ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये!  कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!"

दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून संबंधित बॉडीगार्डशी आपला संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या बाबत आपल्याला जास्त माहिती नसून हा आपापसातील वादातून हा प्रकार झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest