शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणास मुदतवाढ

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण न केलेल्या जिल्ह्यातील ६४८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Farmer Aadhaar verification

संग्रहित छायाचित्र

पुणे : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण न केलेल्या जिल्ह्यातील ६४८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील १ हजार १२१ शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि, जिल्ह्यातील अद्याप ६४८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याने सहकार आयुक्त तथा सहकारी संस्थांचे निबंधक यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. (Farmer Debt Waiver Aadhaar Verification Extension)

योजनेच्या कालावधीत बँकांकडून पीक कर्ज घेऊन, नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच, निधन झाल्याने त्यांना प्रोत्साहनपर लाभ रक्कम अदा करता आली नाही, अशा मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरुन काढून टाकण्याची सुविधा १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध राहील. तसेच वारसांची नोंद संबंधीत कर्जखात्यास करून त्याबाबतची माहिती मयत शेतकऱ्यांच्या संगणकीय प्रणालीवर सादर करण्याची सुविधा दिनांक १८ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध राहील.

उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्र, सीएसी केंद्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आपल्या जवळच्या शाखेत जावून आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्यावे तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी त्यांचे कागदपत्रे संबंधित बँकेत विहित कालावधीत सादर करून वारस नोंद करावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रकाश जगताप यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest