हिला मुख्यमंत्रिपदाच्या नावाचा धुरळा; 'या' महिला राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरू शकतात

राज्य विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी संभाव्य मुख्यमंत्रिपदावरून वेगवेगळी नावे चर्चेत येत असतात. त्यातच दिल्लीला आतिशी यांच्या रुपाने पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री लाभल्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार?

पंकजा मुंडे , वर्षा गायकवाड, सुनेत्रा पवार,नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर, रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे

दिल्लीत आतिशी यांना संधी मिळाल्यानंतर राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून विविध नावांची चर्चा

वृत्तसंस्था:राज्य  विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी संभाव्य मुख्यमंत्रिपदावरून वेगवेगळी नावे चर्चेत येत असतात. त्यातच दिल्लीला आतिशी यांच्या रुपाने पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री लाभल्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार?

असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे, वर्षा गायकवाड, सुनेत्रा पवार, यशोमती ठाकूर, नीलम गोऱ्हे, पंकजा मुंडे या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरू शकतात अशी चर्चा होत आहे. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणतीच स्पष्टता नसताना मुख्यमंत्रिपदाच्या नावाचा धुरळा उडवला जात आहे.  

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असून त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही कंबर कसून तयारी सुरू केली आहे. सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मविआने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने याबाब उत्तर देणे टाळल्याने भावी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण अजूनही अस्पष्ट आहे. महाविकास आघाडी आणि महायुती तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा प्रश्न विचारून परस्पराची कोंडी करायचा प्रयत्न केकरत आहे. याशिवाय दोन्ही आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांचे समर्थक आपलाच नेता भावी मुख्यमंत्री असल्याचा दावा केला जात आहे.     

दरम्यान, दिल्लीला आतिशी यांच्या रुपाने पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री लाभल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? असा प्रश्न  काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात, असं वक्तव्य केले. त्यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, हा प्रश्न मुळात चुकीचा आहे. रश्मी ठाकरे यांनी कधीही राजकारणात रस घेतलेला नाही. त्या नेहमी पतीबरोबर असतात याचा अर्थ असा होत नाही की त्या राजकारणात सक्रीय आहेत. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मात्र, कारण नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव चर्चेत घेता कामा नये. 

वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाली तर मला आनंदच होईल. ५० टक्के आरक्षण देण्यात आपले पहिले राज्य होतो. महिला मुख्यमंत्री झाली तर सर्वांना आनंद होईल. सगळ्या पक्षांकडे चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे रश्मी ठाकरे आहेत.  काँग्रेसमध्येही चेहरे आहेत.

महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाच्या महिला नेत्याला मुख्यमंत्रिपद मिळालं तर मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो, अनेक अडचणी असतात. त्यावर मात करून महिला राजकारणात येतात. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींना काम करताना आम्ही पाहिलं आहे. भाजपात तर महिलांना मंत्रिपदही दिलं जात नाही, पक्षाचं अध्यक्षपद दिले जात नाही.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest