कोकणात जाणाऱ्या ५० एसटी रोखल्याने टोलनाक्यावर तणाव

सातारा: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या पन्नास एसटी बस साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पथकरासाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी पथकर देणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 9 Sep 2024
  • 03:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सातारा: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या पन्नास एसटी बस साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पथकरासाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी पथकर देणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला.

तणाव निर्माण झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या खासगी मोटारी, एसटी बस तसेच इतर वाहनांसाठी महामार्गावरील सर्वच पथकरामधून राज्य शासनाने सूट दिली आहे. कोकणातील मार्गावरील वाहनांची कोंडी, गर्दी आणि खराब रस्त्यांमुळे बहुसंख्य प्रवाशांनी पुणे-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणे पसंत केले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुणे बंगळुरू महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी आहे. मुंबई, पुण्याकडून आलेल्या एसटी बस कोल्हापूर, कराडवरून खाली कोकणच्या दिशेने जाणार होत्या. बस आनेवाडी टोल नाक्यावर रात्री आल्या. कर्मचाऱ्यांनी चालकांकडे टोलची मागणी केली असता, वाहक व चालकांनी कोकणात जाणाऱ्या बसना टोलमाफी असल्याचे सांगितले. मात्र, टोल प्रशासनाने शासनाकडून आम्हाला कोणताही आदेश नसल्याचे सांगून टोलशिवाय जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. दोन्ही बाजूंनी कडक भूमिका घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. 

टोलनाक्यावरील सर्वच मार्गिकेवर एसटी बस थांबल्या होत्या. त्यांच्या मागे अन्य वाहने अडकून पडल्याने महामार्गावर कोंडी झाली होती. एसटीतील प्रवाशांनी आक्रमक होऊन वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे तणावात भर पडली. एकच गोंधळ उडाला. अखेर हे प्रकरण भुईंज पोलीस ठाण्यापर्यंत गेले. त्यांनी टोल नाका प्रशासनाशी चर्चा करून बस मार्गस्थ केल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest