...तरीही उद्धव ठाकरेंनी तोडली युती

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध खुलासे होताना दिसत आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या एका नेत्याने २०१९ च्या सत्तास्थापनेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Uddhav Thackeray

...तरीही उद्धव ठाकरेंनी तोडली युती

भाजपने दाखवली होती उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी, दोघांच्या मध्यस्थीनंतरही झाले नाही समाधान

#मुंबई: आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध खुलासे होताना दिसत आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या एका नेत्याने २०१९ च्या सत्तास्थापनेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद द्यायला भाजपने तयारी दर्शवली होती. यासाठी दोन बड्या नेत्यांनी मध्यस्थीही केली होती. पण तसे झाले नाही. कारण उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याचाच निश्चय केला होता, असा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २०१९ च्या सत्तास्थापनेवेळी काय घडले, याबद्दलचा सविस्तर घटनाक्रम सांगितला. २०१९ च्या निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेनेला बहुमत दिले होते. पण मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू झाला. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे अशी मागणी शिवसेनेची होती. संजय राऊत उद्धव ठाकरेंचे कान भरायचे. त्यामुळे हा वाद वाढतच गेला. भाजपने पहिले अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी शिवसेनेकडून कुणीतरी चर्चेसाठी यावे, अशी मागणी होत होती.

२०१९ च्या निवडणुकीत नेमके काय घडले?

महाराष्ट्रात २०१९ ला झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रि‍पदाचा मोठा वाद निर्माण झाला होता. अमित शाह यांनी आपल्याला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देतो, असा शब्द दिला होता असा दावा उद्धव ठाकरेंकडून सतत होत होता, तर भाजपकडून असा कोणताही शब्द दिला नव्हता असा दावा करण्यात आला होता. यामुळे शेवटी मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये फूट पडली आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. वृत्तसंंस्था

संजय राऊतांनी भरले कान

भाजपने उद्धव ठाकरेंना पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास संमती दर्शवल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाहीत. गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांना सांगितले की, बोलणे करून द्या, पण त्यांचेही त्यांनी ऐकले नाही. शिवसेना-भाजपची ही युती तुटू नये यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदेंनीही त्यांना सांगितले की, भाजप मुख्यमंत्री पद देत आहे. तुम्ही याबाबत विचार करा. पण संजय राऊतांनी कान भरल्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले की, मी त्यांच्यासोबत जाणार नाही, तू जा. त्यांना पाच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे होते. पण तसे होणे शक्य नव्हते. आमचा नाईलाज झाला. आम्ही जो उठाव केला त्याला या बाबीही जबाबदार आहेत. ठाकरेंच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आम्ही उठाव केला, असे संजय शिरसाट म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest