मराठी भाषेच्या विकासासाठी काम करावे लागेल - मोहोळ

मराठीला अभिजात दर्जा मिळणे हा भाषेचा गौरव आहे. आता आपले काम सुरू झाले असून भाषा विकास, प्रचारासाठी काम करावे लागेल. मराठी शाळेत दर्जा सुधारणे, पटसंख्या वाढवणे याबाबत काम करावे लागेल.

Marathi, language, development, Promote Marathi schools, Marathi education initiatives, Increase Marathi school enrollment, Quality education in Marathi, Marathi language programs, Marathi cultural preservation, Marathi literacy campaigns, Support Marathi medium schools, Marathi language resources

File Photo

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल बालगंधर्वमध्ये साजरा झाला आनंदोत्सव

मराठीला अभिजात दर्जा मिळणे हा भाषेचा गौरव आहे. आता आपले काम सुरू झाले असून भाषा विकास, प्रचारासाठी  काम करावे लागेल. मराठी शाळेत दर्जा सुधारणे, पटसंख्या वाढवणे याबाबत काम करावे लागेल. पुढील काळात आपली परीक्षा आहे पुढील अर्थसंकल्पात भाषेसाठी निधी तरतूद करण्यात येईल असे मत केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर, पुणे पुस्तक महोत्सवतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेते प्रवीण तरडे यांनी केंद्र शासनाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. 

यावेळी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी, माजी खासदार प्रदीप रावत, राजीव तांबे, राहुल सोलापूरकर, प्रवीण तरडे, धीरज घाटे, दीपक मानकर, किरण साळी, राजीव बर्वे, सुनील महाजन, राजेश पांडे आदी उपस्थित होते.

साहित्य संमेलन माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, प्रत्येक भाषेचे सेंटर ऑफ एक्सेलंस तयार करून त्यात मनुष्यबळ उपलब्ध करावे. देशात ५० पेक्षा अधिक केंद्रीय विद्यापीठे आहे. त्याठिकाणी आपल्या भाषेचे अध्यासन केंद्र सुरू करावे. अभिजात भाषा आणि अन्य भाषा यात कोणताही मतभेद न करता समप्रमाणात निधी देण्यात यावा. तसेच त्यासाठी वेगळा निधी द्यावा. अभिजात भाषा दर्जा दिल्याने मराठी भाषा प्राचीन असून ती कोणत्या दुसऱ्या भाषेतून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी भाषा ज्ञान भाषा झाली पाहिजे. मराठी नाटक, सिनेमा आपण पहिले पाहिजे. मराठी पुस्तके विकत घेऊन वाचावी. आपली भाषेबाबतची अस्मिता टोकदार होणार नाही, तोपर्यंत ती जिवंत राहून टिकणार नाही.

रामदास फुटाणे म्हणाले,  जर्मन, फ्रांस आणि चीनमधून मातृभाषेत शिक्षण दिले गेल्याने त्यांनी विकास साधला. अभिजात दर्जा टिकवणे हे साहित्यिक, कलाकारांचे काम आहे. विद्यापीठामध्ये भाषेचे शिक्षण दिले जाते. त्याचा वापर प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात झाला पाहिजे. राहुल सोलापूरकर म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी भांडारकर संस्थेने पुढाकार घेतला. तीन प्राध्यापकांनी त्यात सक्रिय भाग घेऊन १२६ पानी अहवाल केंद्र सरकारला २०२३ मध्ये पाठवला होता. आज त्याची पूर्तता झाली आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, जेष्ठ साहित्यिक आनंद माडगूळकर यांचीही यावेळी भाषणे झाली. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest