पार्शश्वनाथ मंदिरासमोरच तुफान राडा

वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर येथे दिगंबर आणि श्वेतांबर जैन यांच्यामध्ये रविवारी तुफान राडा झाला. श्वेतांबर पंथीयांची रॅली सुरू असताना दिगंबर पंथीयांनी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर दोन्ही गटांत सिनेस्टाइल हाणामारी सुरू झाली. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांना चांगलेच भिडले. परस्परविरोधी घोषणाबाजीनंतर मारामारी आणि चप्पलफेकही करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 20 Mar 2023
  • 01:37 pm
पार्शश्वनाथ मंदिरासमोरच तुफान राडा

पार्शश्वनाथ मंदिरासमोरच तुफान राडा

#वाशिम

वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर येथे दिगंबर आणि श्वेतांबर जैन यांच्यामध्ये रविवारी तुफान राडा झाला. श्वेतांबर पंथीयांची रॅली सुरू असताना दिगंबर पंथीयांनी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर दोन्ही गटांत सिनेस्टाइल हाणामारी सुरू झाली. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांना चांगलेच भिडले. परस्परविरोधी घोषणाबाजीनंतर मारामारी आणि चप्पलफेकही करण्यात आली.

वाशिमच्या शिरपूर येथे जैन धर्मीयांच्या पार्श्वनाथांचे मंदिर आहे. श्वेतांबर पंथीयांनी रविवारी पार्श्वनाथाच्या दर्शनासाठी रॅली काढली होती. ही रॅली दिगंबर जैन पंथीयांच्या कार्यालयासमोरून जात असताना दिगंबरांनी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही गटांमध्ये अचानक राडा सुरू झाला. घोषणाबाजी, हाणामारी अन् चप्पलफेकही झाली. या घटनेमुळे गावकरी चांगलेच संतापले होते. दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने हाणामारीला सुरुवात झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झालं होतं. काही वेळातच पुन्हा वाद पेटला.

श्वेतांबर आणि दिगंबर जैन यांच्यामध्ये अशाप्रकारे राडा झाल्याने शिरपूरकर आक्रमक झाले होते. स्थानिकांनी घटनेचा निषेध करून या लोकांनी एकमेकांवर विटा आणि खुर्च्या फेकल्याचे उपस्थित महिला ग्रामस्थांनी सांगितलं. जैन धर्मीयांमध्ये वाद पेटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही वृत्तवाहिन्यांनी या संदर्भातील वृत्त दिले आहे.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest