देशाच्या नेत्यांना राज्यात सत्ता आणता आली नाही

ममता बॅनर्जी, मायावती, जयललिता, बिजू पटनाईक या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना जे जमले ते शरद पवारांना कधीच जमलं नाही. या नेत्यांनी काँग्रेसला आव्हान देत राज्यात स्वतःच्या जोरावर सत्ता संपादन केली, मात्र देशाचे नेते म्हणवणाऱ्या शरद पवारांना राज्यात एकदाही स्वबळावर सरकार स्थापन करता आलेले नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना डिवचले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 20 Mar 2023
  • 01:25 pm
देशाच्या नेत्यांना राज्यात सत्ता आणता आली नाही

देशाच्या नेत्यांना राज्यात सत्ता आणता आली नाही

स्वबळावर लढा म्हणजे जागा कळेल; शिवतारेंनी पवारांना पुन्हा डिवचले

#बारामती

ममता बॅनर्जी, मायावती, जयललिता, बिजू पटनाईक या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना जे जमले ते शरद पवारांना कधीच जमलं नाही. या नेत्यांनी काँग्रेसला आव्हान देत राज्यात स्वतःच्या जोरावर सत्ता संपादन केली, मात्र देशाचे नेते म्हणवणाऱ्या शरद पवारांना राज्यात एकदाही स्वबळावर सरकार स्थापन करता आलेले नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना डिवचले आहे. आताही राष्ट्रवादीने एकट्याने मैदानात उतरावे, जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

विजय शिवतारे बारामतीत रविवारी एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दम असेल किंवा आपला पक्ष लोकाभिमूख आहे, असा त्यांचा दावा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जावे. तुम्हाला जनता तुमची जागा दाखवून देईल, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीला दिले आहे. शरद पवार ५० वर्षे देशाचे नेते आहेत, पण विधानसभेला ७० जागांच्या वर कधी गेले नाहीत. त्यांच्या आसपास काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी यांनी स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले. स्वबळावर सलग तीन वेळा राज्यातील सत्ता मिळवण्यात त्यांना यश मिळाले. एवढेच काय मायावती, जयललिता या नेत्याही त्यांच्या राज्यात यशस्वी ठरल्या. त्यांनी काँग्रेसचे वर्चस्व झुगारून दिले. पवारांनी काय केले तर काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि नंतर त्याच पक्षाशी युती करून मंत्रिपदे मिळवली.

ज्या संगमा आणि तारिक अन्वर यांच्यासोबत मिळून राष्ट्रवादीची स्थापना केली, त्या संगमा यांचा मुलगाही मुख्यमंत्री झाला. यांना मात्र कधीही स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवता आली नाही. वाय. एस. आर. रेड्डी,  बिजू पटनाईक यांनी जे केले  ते राष्ट्रवादीला करता आलेले नाही. राष्ट्रवादीसुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडलेला पक्ष आहे. मग त्यांनी काँग्रेस पक्ष पळवला असे म्हणायचे का ? असा सवालही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला १०५ जागा मिळवून दिल्या. एवढी कामगिरीही पवारांना करता आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा त्यांच्यावर 

विशेष राग आहे.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest