तरुणीच्या पोटात दहा कोटींच्या 'गोळ्या'

मुंबई: महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकेन पकडण्यात यश मिळाले आहे. डीआरआयने विमानतळावर एका ब्राझीलियन तरुणीला अटक केली आहे. या तरुणीकडून अधिकाऱ्यांनी कोकेनच्या तब्बल १२४ गोळ्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या गोळ्या महिलेच्या पोटात होत्या. मुंबई विमानतळावर विमान लॅण्ड करण्यापूर्वी या महिलेने या गोळ्या गिळल्या होत्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 25 Sep 2024
  • 12:08 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई विमानतळावरील अधिकारी थक्क, १२४ कॅप्सूलमध्ये भरून आणले कोकेन

मुंबई: महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकेन पकडण्यात यश मिळाले आहे. डीआरआयने विमानतळावर एका ब्राझीलियन तरुणीला अटक केली आहे. या तरुणीकडून अधिकाऱ्यांनी कोकेनच्या तब्बल १२४ गोळ्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या गोळ्या महिलेच्या पोटात होत्या. मुंबई विमानतळावर विमान लॅण्ड करण्यापूर्वी या महिलेने या गोळ्या गिळल्या होत्या.

भारतामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या या महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या या १२४ कॅप्सूल्समध्ये असलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तब्बल ९ कोटी ७३ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला अटक केल्यानंतर आता हा संपूर्ण प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या कटाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. या महिलेबरोबर इतर कोणकोणत्या व्यक्ती यात सहभागी आहेत याचा शोध घेतला जात आहे.  महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही छापेमारी करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest