प्रसादाच्या कॅरेटमध्ये उंदरांची पिल्ले

मुंबई: सध्या मंदिरांमध्ये मिळणाऱ्या प्रसादावरून चिंता व्यक्त केली जात आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध प्रसादावरून देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली असताना मुंबईमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 25 Sep 2024
  • 11:56 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

तिरुपतीनंतर आता सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या गुणवत्तेबाबत चिंता

मुंबई: सध्या मंदिरांमध्ये मिळणाऱ्या प्रसादावरून चिंता व्यक्त केली जात आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध प्रसादावरून देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली असताना मुंबईमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. भक्तांनी प्रसाद घ्यावा की नाही याची शंका आता मनामध्ये उपस्थित होऊ लागली आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामधील धक्कादायक व्हीडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या कॅरेटमध्ये उंदराची पिल्ले  असल्याचा व्हीडीओ समोर आला आहे. हा व्हीडीओ सिद्धिविनायक मंदिरातील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाचा दावा करणारा व्हीडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात कॅरेटमध्ये भरून प्रसाद ठेवण्यात आला आहे. यामध्ये प्रसादाची पाकिटे ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर एका बाजूला प्लास्टिकच्या पिवशीमध्ये उंदराची पिल्ले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सहा ते सात उंदरांची पिल्ले या ठिकाणी प्रसादासोबत कॅरेटमध्ये असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रसादाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील प्रसाद हा लोकांचा श्रद्धांचा आणि आवडीचा विषय आहे. मात्र त्याच्या गुणवत्तेबाबत आता भाविकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. यावरून मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या अधिकाऱ्याकडून व्हीडीओतील दावा चुकीचा असल्याचे म्हणण्यात आले आहे. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते. मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. हा व्हीडीओ मंदिरबाहेरचाही असू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हायरल फोटो आणि व्हीडीओची चौकशी करण्यात येईल असे सांगितले. प्रसादाच्या टोपलीत उंदीर असल्याच्या व्हीडीओची तपासणी करण्यात येईल, चौकशी होईल. मंदिर प्रशासनातर्फेही घडलेल्या प्रकाराची तपासणी होईल आणि योग्य ते स्पष्टीकरण देण्यात येईल, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest