फडणवीसांच्या ‘बदला पुरा’ पोस्टरवरून वादंग, मुंबई हायकोर्टाचे कडक ताशेरे

मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदेची चकमकीत हत्या झाल्यानंतर गृहखात्यावर सर्वश्री शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. याला दिवस होण्याअगोदर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हातात रिव्हॉल्वर असलेलं आणि बदला पुरा असं लिहिलेलं पोस्टर झळकले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 26 Sep 2024
  • 10:29 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदेची चकमकीत हत्या झाल्यानंतर गृहखात्यावर सर्वश्री शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. याला दिवस होण्याअगोदर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हातात रिव्हॉल्वर असलेलं आणि बदला पुरा असं लिहिलेलं पोस्टर झळकले आहे. आता यावर जोरदार टीका होत असून मुंबई उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. 

पोस्टरवरून उच्च न्यायालयाने पोलिसांसह सरकारला फटकारल्यानंतर पोस्टर्स तात्काळ उतरवण्यात आले. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. न्याय हा कायद्याच्या चौकटीत व्हायला हवा असं विरोधकांचं म्हणणं आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. असं असताना अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरनंतर मुंबई, ठाणे व बदलापुरात काही पोस्टर्स झळकली. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरचं निमित्त करून फडणवीस यांना श्रेय देण्याचा हा प्रयत्न होता. याबाबत न्यायलय  म्हणते, शहरात काही पोस्टर्स लागल्याचं आमच्या निदर्शनास आले आहे. देवा भाऊंनी न्याय केला वगैरे… देवाभाऊ न्याय करत असतील तर इथं कशाला आलात, अशा शब्दांत न्यायालयाने झापले. कोर्टाच्या या संतापानंतर काही वेळातच फडणवीसांचे ते वादग्रस्त पोस्टर्स उतरवण्यात आले. 

काय आहे पोस्टरमध्ये?

मुंबईतल्या काही भागांमध्ये ‘बदला पुरा’ असे लिहिलेली पोस्टर्स लावली आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असून, त्यावर ‘बदला पुरा’ असं लिहले आहे. पोस्टरवरती फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. दुसरीकडे यावरुन विरोधकांनी फडणवीसांवर टीका सुरु केली आहे. या पोस्टरबाबत  सुप्रिया सुळे म्हणतात, जर गृहमंत्रीच हातात पिस्तूल घेऊन बॅनर लावत असतील तर तरुणांमध्ये काय संदेश जाईल. ही मिर्झापूर सिरीज नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest